एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम, दिघा विभागातही स्वच्छता उपक्रम

    13-Aug-2018
Total Views | 28




नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दिनांक 01 ते 31 ऑगस्ट, 2018 या कालावधीत शहरामध्ये “घाण आणि अस्वच्छतेपासून स्वातंत्र्य” (Independence from filth and insanitation) या संकल्पनेच्या आधारे विद्यार्थी व युवक यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

 

त्या अनुषंगाने वाशी विभाग कार्यक्षेत्रातील सागर विहार येथे एनएसएस व एनसीसी विद्यार्थ्यांच्या सहभागाने खाडीकिनारी व परिसरामध्ये विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेप्रसंगी खाडी किना-याची मोठया प्रमाणात साफसफाई करुन प्लास्टीकच्या पिशव्या व निर्माल्य खाडीमध्ये न टाकता ते निर्माल्य कलशामध्ये टाकण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले व स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात आली. तसेच कचरा वर्गीकरणाविषयी व कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात केली. यावेळी वाशी विभागातील स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर, स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष देवरस, श्रीम. जयश्री आढळ, स्वच्छाग्रही श्री. मनोज भगत, विद्यार्थी व स्थानिक रहिवाशी मोठया संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे दिघा विभागातील रामनगर येथील रहिवाश्यांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत व कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणेबाबत प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामध्ये स्थानिक सोसायट्यांमधील रहिवाशी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा विभाग सहा.आयुक्त श्रीम. प्रियांका काळसेकर, स्वच्छता अधिकारी श्री. सुधाकर वडजे, उप स्वच्छता निरीक्षक श्री. तेजस ताटे, कर्मचारी व स्वच्छाग्रही तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121