व्यवसायजन्य आजार आणि त्यावरील उपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


 


लहानपणी भातुकलीचा डाव खेळता खेळता घरातून निघून विमानापर्यंत कधी पोहोचतात, हे त्या चिमुकल्यांनाही कळत नाही. हवाईसुंदरी म्हटली की, सुंदर बांधा, टापटीप राहणी आणि सदैव हसतमुख व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभे राहते. पण ‘या मुखवट्या मागे काय काय दडलय?’ ते या लेखातून जाणून घेऊ या-

 

ही व्यवसाय असे असतात की, ज्याला ग्लॅमरचे वलय खूप असते. त्या व्यवसायाकडे चटकन आकर्षित व्हायला होते. असाच एक व्यवसाय म्हणजेहवाईसुंदरीचा (एअर हॉस्टेस). वरवर पाहता कितीतरी आकर्षक आणि उत्तम पगार असलेली ही नोकरी. याद्वारे विविध देशांमध्ये, खंडांमध्ये, शहरांमध्ये जाता येते. छान-छान कपडे आणि प्रसाधने वापरायला मिळतात. बरे काम काय तर विमानातील प्रवाशांना खायला-प्यायला देणे. बस्स! किती छान! असे वाटणे खूप स्वाभाविक आहे. हवाईसुंदरी (cabin crew in commercial flight) यांच्याबद्दल व्यवसाय आणि तद्जन्य व्याधी याबद्दल सविस्तर बघूया. विमानप्रवास हा कायम समुद्र पातळीच्या किमान पाच हजार ते आठ हजार फुटांच्या वर होतो. जवळच्या शहरांपासून साता समुद्रापलीकडे इतका प्रवास विमानातून करता येतो. जो प्रवास आधी अशक्य होता, तो आता अवघ्या काही तासांमध्ये पार केला जातो. हा प्रवास करते वेळी विमानाच्या आत एक बंदिस्त वातावरण दाब कायम राखायला लागतो. हे वातावरण बहुतांशी कोरडे असते. ज्या दिशेला विमान जात असेल , त्यानुसार वेळेत बदल होतो. (पूर्वेकडील देश भारतापेक्षा पुढे पश्चिमात्य देश मागे या पद्धतीने असतात) म्हणजे भारतात जर दुपारचे दोन वाजले असतील, तर सिंगापूरमध्ये दुपारचे साडे चार आणि दुबईमध्ये सकाळचे साडे अकरा वाजले असतील. ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेत भारताच्या सापेक्ष अख्ख्या एका दिवसाचा फरक पडतो. जेवढे खंड लांब असेल, तेवढे वेळेत अंतर जास्त असते. जिथे जाणार तेथील भौगोलिक परिस्थितीनुरूप हवामानातला बदल आदी सर्व गोष्टींचा परिणाम हवाईसुंदरीच्या आरोग्यावर होतो. विमानामधील हवेत CO2 -कार्बनडाय ऑक्साईड आणि O2- oxygen दाब टिकवलेला असतो. मेन्टेन केलेला असतो. त्यामुळे यातील हवा थंड कोरडी असते. ही हवा डोळे-नाक-त्वचा इत्यादीशी संपर्कात येते. यामुळे डोळे कोरडे होणे, चुरचुरणे, लाल होणे . त्रास उद्भवू शकतात. सतत डोळे मिचकावणे, अंधुक दृष्टी किंवा अश्रूस्राव ही लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. हवेतील दाबाबरोबरच, कोरडी हवा, एसीची थंड हवा, डोक्यावरील दिवे इत्यादीचाही परिणाम होतो. जसा डोळ्यांना त्रास होतो, तसा कानांनाही त्रास होतो. कानात दडे बसणे, कानात आवाज येणे, बधीरपणा येणे इत्यादी तक्रारी हवाईसुंदरींमध्ये उद्भवू शकतात. वातावरणातील दाबाच्या बदलांमुळे र्व्हटिगोचा त्रासही होऊ शकतो.

 

हवाईसुंदरींची शीफ्ट ड्युटी असते. शिफ्ट ड्युटी असली तरी एकाच वेळेतली नसते. वारंवार बदलते. आकाशात अधिक काळ राहणे आणि उतरल्यावर तिकडच्या वातावरणाशी लगेच स्वत:ला सामावून घेणे हे जरा कठीण असते. तसेच जेवढे देश, प्रदेश, खंड लांब तेवढे वेळेत बदल होतात. ज्या देशातून विमान निघाले असेल, ते आपल्या इच्छित स्थळी पोहोचले तरी शरीराचे घड्याळ (बॉडी क्लॉक म्हणजेच circadian rhythm) आधीच्या देशानुसार असते. हाJET-LAGभरून निघायला थोडा अवधी द्यायला लागतो. काही वेळेस, त्याच विमानाने परतीच्या प्रवासाची ड्युटी असते. याचा मुख्य परिणाम झोपेवर आणि पचनशक्तीवर होतो. मलबद्धता, पोट फुगणे, भूक लागणे, आम्लपित्त होणे, जळजळणे, मळमळणे . त्रास वाढतात. झोप झाल्याने किंवा अपुरी झोप झाल्याने प्रसन्न वाटत नाही. डोळ्यांवर झापड येत राहते. कामात संपूर्ण लक्ष देणे अशक्य होते. पचनशक्ती बिघडली की अन्य संस्थांवर (सिस्टिम्सवर) त्याचा परिणाम होतो. मलबद्धतेमुळे, शरीरातील उष्णता वाढल्याने तोंड येणे, केस गळणे .चे प्रमाण वाढते चेहऱ्या वर पुरळ येणे, मुरमे येणे, खाज येणे . लक्षणे उद्भवू शकतात.

 

यावर उपाय म्हणजे, एकदा खाल्ले की चार तास काही खाऊ नये, पण सहा तासांच्या वर उपाशी राहू नये. अन्नातून मसालेदार, तेलकट तिखट, खारट, कॅनिंग केलेले अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावे. झोप कमी झाली असेल, अपुरी झाली असेल तर तिच्या निम्मा वेळ दिवसा झोपावे. पण, जेवणापूर्वी उदा. रात्रीच्या ड्युटीमुळे जर सहा तास जागरण झाले असेल, तर दिवसा जेवणापूर्वी रिकाम्या पोटी निम्मा वेळ म्हणजे तीन तास झोप काढावी नंतर जेवावे. नाक, कान आणि डोळे यांचा प्रत्यक्ष संबंध बाहेरील हवेशी येत असतो. या हवेत आर्द्रता कमी असते. तसेच रूम फ्रेशनरमुळे हायड्रोकार्बन्सचे प्रमाण अधिक असते. वातावरणाचा थर पातळ असतो. ओझोनशी संपर्क अधिक जवळून होतो. तसेच अल्पमात्रेत कार्बन मोनोक्साईड इत्यादी असते. सूर्यप्रकाशालाही अधिक एक्सपोज होतात. या सर्व गोष्टींचा परिणाम जर कमी ठेवायचा असेल, तर रोज अभ्यंग करणे अत्यंत गरजेचे आहे. अभ्यंगामुळे त्वचेची प्रतिकारशक्ती उत्तम होते आणि टिकते. कुठलाही आजार त्या जीवाणुंमुळे होता, शरीर कमकुवत असल्यास, प्रतिकारशक्ती कमी असल्यास जडतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती सुधरवणे हे आपल्या हातात आहे आणि ते गरजेचेही आहे. नाक-कान- डोळे हे स्वाभाविक विवर (नॅचरल ओपनिंगस) आहेत. यामध्ये रोज दोन-दोन थेंब तेल घालावे. (नस्य, कर्णपुरळ आणि नेत्रांजन) यामुळे हवेचा या अवयवांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. एक संरक्षक कवच शरीरावर परिधान केल्याचे परिणाम अभ्यंगामुळे मिळतात. याच बरोबर त्वचा टवटवीत, तुकतुकीत आणि तरुण (ग्लोईंग यंग स्किन) राहण्यास राखण्यासही अभ्यंगाचा उपयोग होतो.

 

विमानातील दाबामुळे (प्रेशरमुळे) मुख्य:त्वे करून कानाचे त्रास (वरील सांगितल्याप्रमाणे) श्वसनसंस्थेचे त्रास (respiratory system) आणि काही अंशी संवहनाचे त्रास (vaswlar)उद्भवतात. काही लक्षणे आधीपासून असल्यास, त्याची प्रखरता वाढते किंवा आतल्या आत होणारा त्रास उफाळून येतो. उदा. धुम्रपान करणाऱ्या ना खोकला, दम लागणे, आवाज बदलणे . त्रास होतात. पण, ओझोनच्या संपर्कात आल्यावर वरील लक्षणांची प्रखरता वाढते. अति ओझोनमुळेही घशामध्ये खवखवणे, खोकला आणि दम लागणे . प्रकार होतात. धुम्रपान करणाऱ्या मध्ये ही लक्षणे वाढतात. त्याचबरोबर छातीत भरल्यासारखे वाटणे किंवा दुखणे सुरू होते. धुम्रपान करणाऱ्या ना पण ज्यांना वारंवार श्वसनसंस्थेच्या तक्रारी असतात अशांमध्येही विमानातील हवेच्या दाबामुळे आणि कमी आर्द्रतेमुळे वरील लक्षणे उद्भवू शकतात. यासाठी श्वसनशक्ती बळकट करावी. प्राणायामाचा नित्य अभ्यास करावा. नस्य (नाकात थेंब घालणे) चुकता रोज करावे. सर्दी होऊ देण्याची खबरदारी घ्यावी. आहारातून थंड, मिठाई, अति गोड दुधाचे पदार्थ टाळावेत दुधातून जेष्ठमध, हळद, सुंठ यापैकी एखादे घालून रोज प्यावे. गरम पाण्यात हळद, मीठ घालून गुळण्या कराव्यात. वेखंडाचा लेप कपाळावर लावावा. ओव्याची धुरी घ्यावी. या सर्व गोष्टींमुळे कफाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. सर्दीच्या तक्रारी कमी होतात. श्वसनसंस्थेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळस खावी, त्याने उत्तम गुण येतो. सर्दी असताना विमानाचा प्रवास केला तर एकाचे इन्फेक्शन दुसऱ्या ला पसरते. जर त्या दुसऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असेल, आजार झाल्यावर औषधी चिकित्सा अवश्य करावी, ती गरजेची आहे. पण, वारंवार आजार होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचबरोबर त्वचेवर सुंदर दिसण्यासाठी विविध सौंदर्यप्रसाधनांचा भडीमार केला जातो. हवाईसुंदरीचा गणवेष प्रामुख्याने तंग आणि अंगाला लागून असतो. केस बांधलेले आणि कायम टोपीच्या आत असतात. त्यांची झोप, आहार अनियमित तर आहेच. पण याचा परिणाम मासिकप्रवृत्तीवरही होताना दिसतो. सततच्या बदलत्या शीफ्टसमुळे तसेच आहारामुळे (वजन आणि बांधा maintain करण्यासाठी ) होणारे परिणाम आणि ताण मानसिक आरोग्य याबद्दल पुढील लेखात जाणून घेऊ या..

 


@@AUTHORINFO_V1@@