धक्कादायक; बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू

    28-Jul-2018
Total Views | 21


 

 

रायगड : महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस ६०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये आतापर्यंत ३४ पैकी ३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

 

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ३४ कर्मचारी महाबळेश्वर येथे मिनी बसने सहलीला निघाले होते. याचदरम्यान पोलादपूर पासून १५ किमी अंतरावर असलेल्या आंबेनळी दरीत हि बस कोसळली. सुदैवाने या बसमधील प्रकाश ठाकूर हा प्रवासी बचावला असून त्यानेच फोन करून हि माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी बचाव पथकांनी धाव घेतली आहे. दरवर्षी विद्यापीठाची सहल जात असते. यावर्षी महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती.

 

दरम्यान, पावसामुळे बचाव पथकाला अडचणी निर्माण होत आहेत. अॅम्ब्युलन्स, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक मिळून सर्वजण मदतकार्य करत आहेत असे स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121