जळगाव :
महापालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी २६ जुलै रोजी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे-पाटील यांच्या तीन जाहीर सभा जळगाव शहरात होणार आहेत. पहिली सभा सायंकाळी ५ वाजता होईल. प्रभाग ६ चे उमेदवार अमित काळे, मंगला चौधरी, ऍड. शुचिता हाडा व धीरज सोनवणे, प्रभाग ७ : उमेदवार सीमा सुरेश भोळे, दीपमाला काळे, डॉ.अश्विन सोनवणे, प्रा.सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा आहे.
सायंकाळी ६ वाजता महाबळ कॉलनी चौकात प्रभाग क्रमांक १२ चे उमेदवार रवींद्र पाटील, उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, प्रा.जीवन अत्तरदे, प्रभाग १३ : सुरेखा तायडे, ज्योती चव्हाण, जितेंद्र मराठे, अंजनाबाई सोनवणे, प्रभाग १४ : रेखा पाटील, सुनंदा सोनवणे, सदाशिव ढेकळे, राजेंद्र पाटील या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होईल. उपस्थितीचे आवाहन संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, मनोज भांडारकर यांनी केले आहे.
पक्ष कार्यकर्त्यांचा आज मेळावा
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराने वेग घेतला असून, २६ रोजी दुपारी १ वाजता मॉडर्न गर्ल्स हायस्कूलच्या सभागृहात (आर.आर.शाळेमागे) भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. याप्रसंगी पक्षाचे प्रदेशस्तरावरील पदाधिकारी, राज्य सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी, पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.