90's Nostalgia : आठवणी ९०च्या दशकातल्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2018   
Total Views |

 
 
90's Kids म्हटलं की अनेक मीम्स डोळ्यांपुढे उभे राहतात. तुमच्याकडे अनेक टीशर्ट्स, कॉफीमग्स आणि काय काय असेल या 90's Kids संबंधित. मात्र ९०च्या दशकातील मुलांच्या भावना नक्कीच या सगळ्याशी जोडल्या गेल्या आहेत. ९०च्या दशकातील गाण्यांपासून ते कार्टून्सपर्यंत आणि जाहीरातींपासून ते मालिकांपर्यंत सगळंच खास होतं. हे असं दशक होतं, जे पूर्णपणे आधुनिकही नव्हतं आणि पूर्णपणे पारंपारिकही नाही. या दशकातील मुलांनी पंरपरेचं महत्वही जाणलं आहे, आणि नुकत्याच झालेल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीची पहिली साक्षीदार देखील हीच पिढी ठरली आहे. अगदी चाचा चौधरी, फॅण्टम, पिंकी, बिल्लू ते अंकल स्क्रूज पर्यंत आणि इंडी पॉप पासून ते हम्मा हम्मा आणि तम्मा तम्मा सारख्या गाण्यांपर्यंत. रस्ना, किस्मी आणि बोरकूट पासूर ते WWE स्मॅक डाऊन, रॉयलरंबल आणि व्यापार, व्हिडियोगेम सारख्या खेळांपर्यंत... ९०च्या दशकाची मजाच काही और होती.
 
तर या ९०च्या दशकातील अनेक आठवणींना उजाळा देण्यासाठी मी हे एक सदर घेऊन येत आहे. "90's Nostalgia". ही कुठेतरी तुमची आमची कहाणीच असेल असं नक्की वाटून जाईल हे वाचून. काही पालकांना त्यांच्या मुलांचं लहानपण आठवेल तर काही मुलांना त्यांचे पालक त्यावेळी कसे होते हे आठवेल. ९०च्या दशकातील प्रत्येक एका 'एक्सायटिंग फॅक्टर'ला म्हणजेच प्रत्येक अशा खास गोष्टीचा समावेश यात करण्यात येईल.
 
त्यामध्ये गाणी असतील, कार्टून्स असतील, मालिका असतील, जाहीराती असतील, गायक असतील, अभिनेते असतील, पुस्तकं असतील, कविता असतील, खेळ असतील, आणि खूप काही असेल. पुढच्या गुरुवार पासून दर आठवड्यात...
चक्कर मारून येऊयात एकदा पुन्हा 90's च्या गावात...
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@