जम्मू काश्मीर येथे यासिन मलिकला अटक

    21-Jun-2018
Total Views | 343

 
 
श्रीनगर : जम्मू काश्मीर येथे फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असलेल्या मलिकला मेसुमा येथील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काश्मीर येथे वाढत्या दहशतवादाला आणि हिंसाचाराला जबाबदार असलेल्या अशा सर्व नेत्यांची, दहशतवाद्यांची तपासणी सध्या सुरु आहे.
 
 
 
 
अटक करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र काश्मीर येथे वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी ही कारवाई केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान जम्मू व काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळणे व राज्यपाल राजवट लागू होणे, या राजकीय घडामोडींचा परिणाम भारतीय सैन्यदलाने दहशतवाद्यांविरोधात चालवलेल्या मोहिमेवर होणार नसून दहशतवाद्यांना ठेचणे सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट निर्वाळा भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे.
 
आमची मोहीम आम्ही केवळ रमजानच्या काळात थांबवली होती. मात्र, त्यामुळे काय झाले हे आपण पाहिलेच. जम्मू व काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यामुळे आमच्या दहशतवादविरोधी मोहिमेत काहीही खंड पडणार नसून ती आधी जशी सुरु होती तशीच पुढेही सुरू राहील. या मोहिमेत कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नसल्याचे रावत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यापुढे देखील अशा अनेक घडामोडी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121