शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : HOW MOMS PROTECT US

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-May-2018   
Total Views |
 
 
 
 
 
"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" हे वाक्य किती खरं आहे नाही का. नुकताच जागतिक माता दिन म्हणजेच "मदर्स डे" होवून गेला. आणि या निमित्ताने आपण सगळ्यांनीच आपापल्या आयांची एक तरी आठवण सोशल मीडियावर शेअर केली असणार. मात्र आपल्या आयुष्यात अशा अनेक परिस्थिती निर्माण होतात, ज्यामध्ये आपली आई येते आपले रक्षण करण्यासाठी. मग ते एखाद्या संकटापासून असू देत, अगदीच वडीलांच्या रागापासून असू देत किंवा इतर कशाही पासून. अशीच कथा आहे या लघुपटात.
 
खरं तर हा लघुपट काही एकसंद अशी कहाणी नाही. यामध्ये आई, मुलगा आणि वडील असा छोटासा एक परिवार आहे. आणि आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यामध्ये दाखवल्या आहेत. वडील कसे शिस्तप्रिय असतात, त्यांची कशी एक विचारधारा असते हे तर यात दाखवण्यात आलंच आहे. मात्र त्या सगळ्याच्या पलिकडे जाऊन आपली आई कसं आपल्याला सांभाळून घेते, आपल्याला समजून घेते आणि आपली बाजू वडीलांना समजावून सांगते हे यामध्ये दाखविण्यात आलं आहे. अतिशय मनाला भावणारा आणि खरा वाटणारा, आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडणारा असा हा लघुपट आहे. आपल्या आईची आठवण करुन देणारा असा हा लघुपट आहे. त्या घटना कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मात्र नक्की बघा हा लघुपट. 
 
 
 
 
 
 
एसआयटी या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलने या लघुपटाचा निर्माण केला आहे. यामध्ये मेघना मलिक, केवर वोरा आणि अमित बहल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर याचे लेखन आणि दिग्दर्शन मोहित हुसैन यांनी केले आहे. यूट्यूबवर या लघुपटाला २ लाखांहून जास्त व्ह्यूज आहेत.  
 
 
@@AUTHORINFO_V1@@