डायनोसॉरचं विश्व

    07-Apr-2018   
Total Views | 30
 

 
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, पृथ्वीतलावर ’डायनोसॉर’ नावाचे एक प्राणी कोणे एकेकाळी अस्तित्त्वात होते. पण, या विशालकाय प्राण्याचं अस्तित्वच पूर्णपणे नष्ट होण्याची कारणं काय? यावर अनेक तर्कवितर्क आत्तापर्यंत चर्चिले गेले. या प्रश्नावरून अनेक वैज्ञानिकांना डायनोसॉरने कोड्यात टाकलं होतं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून देश-विदेशातल्या वैज्ञानिकांनी यासंदर्भात संशोधन करून अनेक प्रश्नांची उकल केली आहे. त्यातच आता येत्या काही दिवसांमध्ये डायनोसॉरच्या उत्क्रांतीमधील महत्त्वाच्या कालखंडावर प्रकाश पडू शकेल, अशी शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. कारण, स्कॉटलंडच्या ’ऑईल ऑफ स्काय’ बेटांच्या ईशान्येकडील किनार्‍यांवर एडिंबरा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांकडून सुरू असलेल्या संशोधनादरम्यान १७ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. यापैकी बहुतांश ठसे लांब मानेच्या ’सॉरोपॉड्‌स’ या डायनोसॉर प्रजातीचे असून, त्यांची उंची सुमारे दोन मीटर इतकी होती. त्याचप्रमाणे यातील काही ठसे हे ’थेरोपॉड्‌स’ या डायनोसॉर प्रजातीचेही आहेत. त्यांचा आकारही ’सॉरोपॉड्‌स’शी मिळताजुळता होता.
 
स्काय बेटांवर ’सॉरोपॉड्‌स’ प्रजातींचे ठसे सापडण्याची ही आतापर्यंतची दुसरी वेळ आहे. डायनोसॉरचे अस्तित्व पृथ्वीवर होते, हे आता विविध संशोधनांतून सिद्ध झाले असले तरी भौगोलिक, नैसर्गिक बदलांमुळे डायनोसॉरचे अस्तित्व नष्ट झाले. त्याच्याविषयी जगभरात अजूनही संशोधन सुरूच आहे. यातूनच डायनोसॉरच्या पक्ष्याच्या रूपातील प्रजातीचा शोध लागल्याचा दावा कॅनडातील संशोधकांनी केला आहे. कॅनडात त्याचे जीवाश्म सापडले आहेत. जीवाश्माच्या संशोधनानुसार ’अर्ल्बटाव्हेंटर’ ही डायनोसॉरची प्रजाती सुमारे सात कोटी दहा लाख वर्षांपूर्वी अर्ल्बटामध्ये आढळून आली होती. त्याची उंची मानवाएवढी होती, असे आढळून आले. शास्त्रज्ञांनी या नव्या जातीचे नामकरण ’अर्ल्बटाव्हेंटर क्यूरी’ असे केले आहे. ’अर्ल्बटाव्हेंटर’चे डायनोसॉरच्या कुळातील ’टुडॉन’ या प्राण्यांशी साम्य दिसून आले. ’टुडॉन’चा पृथ्वीवर वावर सात कोटी ६० लाख वर्षांपूर्वी होता. ’अर्ल्बटाव्हेंटर’च्या ५० लाख वर्षांपूर्वी ते अस्तित्वात होते. हे दोन्ही प्रकारचे डायनोसॉर दोन पायांवर चालत असत. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, अंड्यातून बाहेर पडणार्‍या जन्मजात डायनोसॉरचंच वजन दहा किलोग्रॅम असायचं. त्यांच्या वाढत्या वयानुसार ते ३० ते ५० टनापर्यंत वाढायचं.
 
तसेच चीनमध्ये शास्त्रज्ञांना नुकताच ‘टेरोसॉर’ नावाच्या पंखवाल्या डायनोसॉरच्या अंड्यांचा जीवाश्म खजिना सापडला आहे. तीन मीटर चौरस आकाराच्या वालुकाश्मात शास्त्रज्ञांना सुमारे २१५ अंडी सापडली आहेत. ही सर्व अंडी ’टेरोसॉर’ नावाच्या डायनोसॉरची आहेत. पंख असलेला हा डायनोसॉर सुमारे १२ कोटी वर्षांपूर्वी या भागात राहत होता. या डायनोसॉरला पंख असले तरी त्याला उडता येत नव्हते. ‘चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे शास्त्रज्ञ झिओलिन वांग व त्यांच्या सहकार्‍यांनी अंड्यांचे हे जीवाश्म शोधून काढले आहेत. या अंड्यांसोबत पूर्ण वाढ झालेल्या ‘टेरासॉर’चे जीवाश्मही आढळले आहेत. ‘डायनोसॉर’ हा शब्द उच्चारला की, आपल्या डोळ्यांसमोर एकेकाळी पृथ्वीवर असलेला महाकाय प्राणी येतो. पण, सगळेच डायनोसॉर खूप मोठ्या आकाराचे नव्हते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, डायनोसॉरही वेगवेगळ्या आकारांचे होते. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, पण काही डायनोसॉर हे कोंबडीच्या आकाराएवढे किंवा त्यापेक्षाही छोटे होते. ‘कॉम्पसॉग्नॅथस’ जातीचे डायनोसॉर केवळ ७० सेमी लांबीचे होते. कीटक आणि लहान प्राणी खाऊन हे डायनोसॉर जगत असत. या डायनोसॉरचा सांगाडा आधुनिक पक्ष्यांच्या सांगाड्याशी बराच मिळताजुळता आहे. मोठ्यात मोठ्या डायनोसॉरचा आकार नेमका किती होता, यावर शास्त्रज्ञांमध्ये दुमत आहे. पण, साधारणपणे ’ब्राचिओसॉरस’ हा सर्वात मोठा डायनोसॉर आहे, असं म्हटलं जातं. त्याचा आकार साधारणपणे १०० फूट लांब, तर त्याचं वजन १२८ टन होतं, असं म्हणतात.
 
 
 
 
- सोनाली रासकर 
 

सोनाली रासकर

समाजशास्त्र, इतिहास घेऊन बी.ए. पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला आहे. फिचर स्टोरी, तसेच  सामाजिक विषयावरील लिखाणाची आवड, गुन्हेगारीशी संबंधित मालिका बघण्यामध्ये रस. सध्या दै. ’मुंबई तरूणभारत’मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121