बुद्ध पोर्णिमेनिमित्त आज दिल्लीत कार्यक्रमांचे आयोजित

    30-Apr-2018
Total Views | 27
 
 
 
 
 
नवी दिल्ली : संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखविणारे गौतम बुद्ध यांची आज जयंती असल्याने नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच इतर प्रमुख राजकीय नेते उपस्थित असणार आहे. भगवान बुद्ध दया, सेवा आणि त्यागाचे प्रतिक होते त्यांनी संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवला. भगवान बुद्ध यांनी जगातील लाखो नागरिकांना जगण्याचा मार्ग दाखविला आहे. 
 
 
 
 
 
आज बुद्ध जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्र व माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावरून देशवासीयांची बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेपाळमधील बऱ्याच भागांमध्ये आज बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. भगवान बुद्ध यांचे जन्मस्थळ लुम्बिनी येथे मोठ्या संख्येने भाविक पूजा-पाठ करीत आहेत. 
 
 
 
 
 
गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असे म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. 
 
 
 
 
बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ असे म्हणतात. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या ३५ व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121