आकाशाशी जडले नाते - डीझाईनर आकाश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018   
Total Views |


“सुमित, दुर्गाबाई तुझी फार वाट पाहत होत्या बरे!”, आबा सुमितला म्हणाले.


“का ग आजी, काही काम होते का?”, सुमितने दुर्गाबाईंना विचारले.


“काम कसले? तू आल्याशिवाय मी डीझाईनर आकाश दाखवणार नाही ना? म्हणून!”, आबा डोळे मिचकावून म्हणाले.


“पुरे! पुरे हं! उगीच काहीतरी समज करून घेऊ नका! आता सुमित आला आहे, तर दाखवा बरे तुमचे काय ते डीझाईनस् चे नमुने!”, न राहवून दुर्गाबाई म्हणाल्या.

“बरे तर, हे डीझाईनस् कसे पाहायचे ते आधी सांगतो. एकाच दिवशी पूर्ण डीझाईन दिसत नाही. हे भव्य डीझाईन बाप्पा रोज थोडं थोडं दाखवतो. आपलं काम काय ? तर रोज आकाश निरीक्षण करायचं. आज दाखवलेला डीझाईनचा भाग नोंदवायचा. आणि मग त्यातच उद्याच्या निरीक्षणाची भर घालायची. असे महिना महिनाच काय, वर्ष वर्ष केलं की मग पूर्ण डीझाईन आकारास येते.

“तर, हे पहिले डीझाईन बघा! एक महिनाभर, रोज आकाशात दिसणारे चंद्रबिंब टिपले आहे. ठरविक वेळेला चंद्राचे फोटो काढून ते एकत्र केले आहेत. पहा कसे डीझाईन तयार होते.





“आता हे डीझाईन पहा! हे एक वर्षाचे डीझाईन आहे. या मध्ये २०१८ मधील प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक दिवशीची चंद्रकोर रेखली आहे. त्या कोरींचे मिळून होणारे विविध patterns पहा! आहेत की नाही सुंदर?”, आबा म्हणाले.





“आजी हे डीझाईन भन्नाट आहे! माझ्यासाठी असंच मफलर विणून दे!”, सुमित म्हणाला.


“कार्ट्या! मफलर कसलं मागतोस?”, दुर्गाबाई सुमितला म्हणाल्या.


“हे पहा अजून एक, या मध्ये पण एका वर्षातील चंद्राच्या कला नोंदवल्यावर होणारे डीझाईन.”, आबा म्हणाले.




“आणि हे आहे दहा वर्षांचे कॅलेंडर.”, आबा म्हणाले.





“बापरे! इतकी वर्ष आकाश निरीक्षण करून नोंद ठेवायची? रोजच्या रोज आकाश बघायचे?!”, सुमित म्हणाला.


“अरे काय सांगू तुला! काही काही डीझाईनस् पहाण्यासाठी एक आयुष्य सुद्धा कमी पडते. पुन्हा पुन्हा पृथ्वीवर यावे आणि आकाशात उमटणारी चित्रे पाहत राहावे अशी नितांत सुंदर आणि भव्य डीझाईनस् तो बाप्पा तयार करतो!”


“आबा, तुम्ही सारखं सारख ‘तो बाप्पा आकाशात बसून तयार करतो’ म्हणताय. कोण आहे हा बाप्पा?”, सुमितने विचारले.


“आकाशात बसून सगळी चित्र काढतो, तो ‘आकाशातला बाप’ आहे!”, आबा म्हणाले.


“आकाशातला बाप? हे काय नवीनच!”, सुमित म्हणाला.

“नवीन नाही रे सुम्या! फार पुरातन काळापासूनचा बाप आहे. आद्य बाप म्हण! पुढच्या वेळी तुला या ‘आकाशातल्या बापाच्या’ गोष्टी सांगेन!”, आबा म्हणाले.

Pictures from –


१. http://twanight.org
२. www.cafepress.com

३. cargocollective.com

४. www.commarts.com
 
- दिपाली पाटवदकर 
@@AUTHORINFO_V1@@