चिह्न निमित्त - Symbol

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018   
Total Views |

क्षणभर विचार करा, आपण एखाद्या नाटकाच्या प्रयोगासाठी पडदा उघडण्याची अधीरतेने वाट पाहात प्रेक्षागृहात बसलो आहोत किंवा प्राथमिक शाळेतले विद्यार्थी होऊन शाळेचा वार्षिकोत्सव सुरु होण्याची आपली बालसुलभ उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कधीतरी खूप छान सजावट केलेल्या श्रीरामाच्या देवळाच्या सभागारात कीर्तनकाराची तयारी पहात रामनवमीच्या दिवशी कीर्तन सुरु व्हायची उत्सुकतेने आपण वाट पहात आहोत किंवा भल्या मोठ्या मैदानात हजारो प्रेक्षकातील एक होऊन आपल्या आवडत्या नेत्याच्या भाषणाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहोत. अशा प्रत्येक क्षणांमधे उत्तम स्वरसंगीत आणि वाद्यमेळ, रंगीत देखावे, विविधरंगी फुलांची आकर्षक महिरप, चित्रमय नेपथ्य, रुबाबदार परीधानात नटलेले प्रेक्षक आणि गद्य आणि पद्य शब्दांनी रंगणारा रंगमंच, उत्तम वक्तृत्व आणि वाक्चातुर्य, देवळाचे सभागार आणि सभेचे व्यासपीठ. आपण सर्वांनी असे उत्सवी थरारक जिवंत अनुभव प्रत्येक वयामधे निश्चितपणे घेतले आहेत.

या सर्व उत्सुक क्षणांमधे, आपल्याला त्या त्या वातावरणात तन्मय करणारे जे काही होते किंवा असते त्या प्रत्येक व्यक्ततेला नाट्यमय चिह्नसंकेत असेच म्हणायला हवे. कारण आपण अनुभवलेल्या त्या प्रत्येक क्षणी अशी चिह्न त्यांचे निश्चित संकेत आणि अर्थातच आपल्या स्वतः च्या संवेदनशीलते नुसार त्यातील सहज उलगडत जाणारे भावार्थ आणि अनुभवता येऊनही उलगडा न होणारे सूक्ष्मार्थ आणि गूढार्थ म्हणजेच चिह्नसंकेतांचा परिणाम.

एखाद्या सर्वतोपरी अपरिचित व्यक्तीने, सुहास्यमुद्रेने तिचा हात आपल्या समोर हस्तांदोलनासाठी अनपेक्षित क्षणी समोर धरला तर आपली प्रतिक्रिया काय असेल ? असा उत्स्फूर्त पुढे आलेला हात म्हणजे जगभरात सर्वमान्य असलेला स्नेहभावनेचा, मित्रत्वाचा संकेत. भाषा, धर्म, रंग, वय, शिक्षण, राष्ट्रीयत्व या सर्वांच्यापलीकडे जाणारा दोन माणसांमधला प्रसन्न, आनंदी स्वागताचा संकेत दुवा. परंतु हाच हात, वळलेली मुठ घेऊन आपल्यावर उगारला गेला तर मात्र तो तीव्र द्वेष, तिरस्कार आणि शत्रुत्वाचा संकेत असेल. याचा अर्थ आपल्या प्रत्येकाला, अशा चिह्नांचा अथवा हस्तमुद्रा आणि शरीरमुद्रांचा जन्मतः च परिचय असतो.

‘चिह्न’ या शब्दाचे अन्य पर्यायी मराठी शब्द आपण पाहूया. ‘खुण’ ‘मुद्रा’ ‘प्रतिक’ ‘संकेत’ ‘निशाणी’ ‘लक्षण’ ‘इशारा’ असे पटकन आठवणारे काही पर्यायी शब्द. आता थोडे English भाषेतील काही पर्याय शोधूया. English भाषेत आपल्याला सापडतात दोन शब्द. Sign आणि Symbol. मराठीत चिह्न या एकाच शब्दाने संबोधित होणाऱ्या या दोन English शब्दांचे अर्थ पाहूया.

Symbol हा इंग्लिश शब्द “to compare” अशा अर्थाच्या मूळ ग्रीक क्रियापदापासून बनला आहे. अर्थातच यामुळे, Symbolism म्हणजे तुलना करणे असा अर्थ अभिप्रेत आहे. ऐहिक, सांसारिक अथवा भौतिक गोष्टी आणि विषयांची आत्मिक, अध्यात्मिक आणि पारलौकिक अशा तत्वाशी केलेली तुलना असा प्राथमिक संदर्भ आणि मथितार्थ अपेक्षित आहे. मात्र व्यावहारिक जगात याचे अन्य संदर्भ आहेतच.


काही Symbol अथवा चिह्न Universal अथवा Generic Symbol अशा विशेषणाने संबोधली जातात कारण त्यांचे अर्थ वैश्विक किंवा सर्वव्यापक असतात. भाषा, भाषेची लिपी, धर्म अथवा लोकसंस्कृती आणि वाहतूक नियम यात बदल झाला तरी त्यांच्या स्वीकृत अर्थामधे कधीच बदल होत नाही. संपूर्ण जगभारत अशा चिह्नांचा एकच अर्थ, प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजलेला असतो.




Mathematics म्हणजे गणित किंवा अंकशास्त्र आणि Chemistry म्हणजे रसायनशास्त्र याच्या चिह्नांनासुद्धा Universal अथवा Generic Symbol असेच संबोधिले जाते.

काही Symbol विशिष्ट संस्कृती, काही वंश, काही धर्म, काही संप्रदाय किंवा एका खास ग्राहक गटापुरते मर्यादित असतात आणि त्याचा परीचय समाजातील फार निवडक लोकांपुरता मर्यादित असतो. अशा Symbol ‘Specific’ Symbol अशा विशेषणाने संबोधित केल्या जातात. बहाय फेथ (Bahay faith) या जगातील सर्वात छोट्या धर्मनिष्ठ पंथाचे चिह्न अथवा Rotary International या जागतिक संघटनेचे चिह्न, ही याची उदाहरणे.




बहाय फेथ
 
 
 




रोटरी इंटरनॅशनल
या बरोबरच ‘Specific’ Symbol किंवा Sign याला मराठी अथवा अन्य व्यवहाराच्या भाषेत; सूचक, द्योतक, दर्शक, निर्देशक, एम्ब्लेम, ट्रेडमार्क, लोगो किंवा ईमेज या संबोधनाने ओळखले जाते. यातले लोगो, ट्रेडमार्क किंवा एम्ब्लेम फार थोड्या लोकांना माहित असतात. याचा अर्थ सगळ्यांना सहजी समजत नाही तो इतरांनकडून समजून घ्यावा लागतो. मर्यादित अर्थाची निर्मिती करताना काही उत्पादने आणि सेवा अशा व्यापाराची जाहिरात करताना हे Symbol वापरले जातात. उदाहरणार्थ टाटा मोटर्स, महिंद्र अॅंड महिंद्र, मारुती सुझुकी, ह्युंडाइ मोटर्स, होंडा मोटर्स अशा वाहन निर्मात्यांचे लोगो किंवा एम्ब्लेम.


लक्षपूर्वक पहिले तर वरील प्रत्येक लोगो, वाहने फिरतात त्याच रस्त्याचे प्रतिक वापरून तयार झालेला आहे. मात्र असे रस्त्याचे प्रतिक, प्रत्यक वाहन निर्मात्याच्या नावाच्या अद्याक्षरावरून बनले आहे. आपला मुद्दा इतकाच आहे की, हे फार मर्यादित लोकांना माहित असलेली Sign अथवा सूचक चिह्ने आहेत. अशा चिह्नांना Universal अथवा Generic Sign म्हणजे वैश्विक किंवा व्यापक चिह्न असा दर्जा प्राप्त होत नाही.

काही Symbol या एकाच व्यक्तीच्या वापरातील असतात आणि त्यांना individual symbol असे संबोधित केले जाते. या एका व्यक्ती शिवाय त्याचा उपयोग कोणीही करू शकत नाही. कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षि शाहू महाराज यांचा वैयक्तिक Coat of Arms आणि ध्वज हे याजे उत्तम उदाहरण. राजा आणि त्याचे राज्य यामधील केला जाणारा फरक इथे स्पष्ट दिसतो. छत्रपती राजर्षि शाहू महाराजांच्या वैयक्तिक स्थावर मालमात्तेवर अर्थात त्यांचा राजवाडा, त्यांच्या मोटारी अशावर हा Coat of Arms अंकित केलेला असे आणि ध्वज फडकत असे.



राजर्षि शाहू महाराज Coat of Arms.
दोन मशाली आणि एक मध्ययुगीन तलवार अशा या राजचिह्नाचा सविस्तर परिचय पुढच्या लेखांमधे होईलच.

- अरुण दिनकर फडके
@@AUTHORINFO_V1@@