राष्ट्रकुल स्पर्धेतील बॉक्सिंग प्रकारात सुपर मॉम मेरी कॉमची सुवर्ण कमाई
गोल्ड कोस्ट : सुपर मॉम आणि भारताची प्रसिद्ध बॉक्सर मेरी कॉमने आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४५-४८ किलो वजनीगटात मेरी कॉमने या पदकाला गवसणी घातली आहे. उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर ५-० ने मात करत ३५ वर्षीय मेरी कॉमने पुन्हा एकदा स्वत:ला सुपर मॉम म्हणून सिद्ध केले आहे.
५-० अशा मोठ्या फरकाने मेरी कॉमने क्रिस्टिना ओहारावर विजय मिळवत राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले पहिले पदक तिने मिळविले आहे. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या मेरी कॉमकडे राष्ट्रकुल स्पर्धेतील एकही सुवर्ण पदक नव्हते. मात्र आज मेरी कॉमने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक तिच्या नावावर करून घेतले. मेरी कॉमच्या या ‘गोल्डन पंच’नंतर भारताच्या खात्यात आता एकुण १८ सुवर्ण पदके जमा झाली आहेत.
भारताच्या खात्यात सध्या १८ सुवर्ण, ११ रजत तर १४ कांस्य पदक जमा झाली असून पदकांची एकूण संख्या ४३ एवढी झाली आहे.