ज्येष्ठ तमिळ नेते नटराजन मरुथप्पा यांचे निधन

    20-Mar-2018
Total Views | 5




चेन्नई : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सध्या तुरुंगामध्ये असलेल्या ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला नटराजन यांचे पती नटराजन मारुथप्पा यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. 'मल्टीपल ऑर्गन फेल्युअर'मुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान आज सकाळी त्यांचे पार्थिव त्याच्या निवासस्थांनी आणले गेले.
 
 
नटराजन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चिंताजनक होती. छातीमध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे १६ मार्चला त्यांना चेन्नईतील ग्लेनईगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुग प्रियान यांनी नटराजन यांच्या मृत्यूविषयी सांगितले. नटराजन यांना बरे करण्यासाठी आम्ही सर्वप्रकारचे प्रयत्न केले परंतु त्यामध्ये आम्हाला यश आले नाही याचे आम्हाला दु:ख असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशी प्रार्थना आम्ही करतो असे प्रियान यावेळी म्हणाले. यानंतर नटराजन यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले.

 
नटराजन यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नटराजन यांच्या पत्नी शशिकला या तुरुंगात असल्यामुळे त्या अंत्यसंस्कार विधीला उपस्थित राहणार का ? या विषयी थोडी साशंकता व्यक्त केली जात आहे. परंतु टीटीव्ही दिनकरन आणि शशिकला यांचे समर्थकांना त्यांना यावेळी घेऊन येतील, असा विश्वास काही जण व्यक्त करत आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

शिक्षण क्षेत्रात युट्युब करणार महाराष्ट्राला सहकार्य

भारतात 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाही. देशात मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटिव्हिटी' असून त्यामध्ये मुंबईचे स्थान अग्रगण्य आहे. मुंबई हे देशाचे ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ आहे. पुढील काळात मुंबईत आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटच्या रचनेमध्ये युट्यूबचा सहभाग आवश्यक आहे. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहकार्याने बदल घडविण्यासाठी युट्यूबने सहकार्य केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला...

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे

महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन :पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर येथे दि.२ ते ४ मे २०२५ रोजी 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर इथे ६० पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो,विविध पर्यटन सहली,सांस्कृतिक कार्यक्रमांचे २ ते ४ मे रोजी आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121