आकाशाशी जडले नाते - लपंडाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018   
Total Views |

 
“आबा, गुरुवर जर सारखी सारखी सूर्य ग्रहणे होतात, तशी चंद्र ग्रहणे पण होत असतील ना?”, सुमितने विचारले.


“मग काय! सारखीच होत असतात. आपण आयो या चंद्रांची केस पाहू. आयो रात्री गुरूच्या सावलीत गेला, की गुरूवरून चंद्रग्रहण दिसते. आयो हळूहळू गुरूच्या सावलीत जातो. गायब होतो. आणि दोन एक तासांनी बाहेर आला की पुन्हा सूर्यप्रकाशात चमकायला लागतो.


“आता, या नाट्यात चंद्रावर काय होते ते पण पाहू! आयोवर अनेक ज्वालामुखी आहेत. आयोवर या ज्वालामुखिंमधून उत्सर्जित झालेले वायू आहेत. आयो गुरूच्या सावलीत गेला की त्यावरचे तापमान खाली जाते. तापमान कमी झाले की आयो वरील वायू गोठतात. दोन तासांनी आयो गुरूच्या सावलीतून बाहेर उन्हात आला की पुन्हा थोडा तापू लागतो. आणि काही वेळात त्याचे गोठलेलं वातावरण पुनश्च normal होते.”, आबा म्हणाले.


“तिथल्या news channels ची धमाल आहे! दररोज एकदा ब्रेकिंग न्यूज ... ‘आताच हाती आलेल्या बातमीनुसार आयो येथील वातावरण तंग आहे’ या बातमीला थोडा वेळ coverage देऊन झाले की पुन्हा एक ब्रेकिंग न्यूज ... ‘आमच्या सूत्रांकडून खात्रीशीररित्या असे समजते की आयोवरचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे!’”, सुमितच्या बातमीने दुर्गाबाई तोंडाला पदर लावून हसल्या!


“शंकरराव, आता Nation must know की आयोचे ग्रहण पृथ्वी वरून कसे दिसते?”, दुर्गाबाईंनी विचारले.


“आज मला भारी प्रवास करायला लावणार तुम्ही दोघे! आयो गुरूच्या सावलीत गेला, अंधारात गेला, की आपल्या दुर्बिणीतून तो गायब होतो! थोडावेळ फक्त ३ चंद्र दिसतात. आयो सावलीतून बाहेर आला की पुन्हा गुरुचे चार चंद्र दिसतात!


“कधी कधी हे चंद्र आपल्याशी लपाछपी खेळतात. गुरूच्या सावलीत नाही, पण बेटे गुरूच्या मागे लपतात. मग ते पृथ्वीच्या view मधून गायब होतात. या घटनेला occult म्हणतात.


“कधी कधी त्याचे चंद्र एकमेकांच्या मागे लपतात! पुन्हा चंद्र गायब!


“आणि कधी कधी गुरु चंद्राच्या मागे लपायचं प्रयत्न करतो! अर्थातच दिसते असे की, चंद्र गुरूच्या समोरून प्रवास करत आहेत. या घटनेला transit म्हणतात.


“सुमित, गुरुचे जवळ जवळ ७० चंद्र गुरु भोवती भ्रमण करतांना आणखी काय काय घटना घडत असतील?”, आबांनी विचारले.


“सरळ आहे. आपल्याला एक चंद्र आहे. तो एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण घडवतो. गुरूच्या ७० चंद्रांमुळे - ७० सुर्यग्रहणे आणि ७० चन्द्रग्रहणे घडत असतील.”, सुमित विचार करत म्हणाला. “आबा, चंद्राची सावली गुरुवर पडते तशी एका चंद्राची सावली दुसऱ्या चंद्रावर पडू शकते का?”


“शाब्बास पठ्ठ्या! हो, कधी कधी एका चंद्राची सावली दुसऱ्या चंद्रावर पडते तर! हे पहा युरोपाची सावली कलीस्टोवर पडली आहे. अर्थातच या वेळी कलीस्टोवर सूर्यग्रहण घडते.


“युरोपावरून कलीस्टोचे चंद्रग्रहण दिसेल.


“हीच घटना गुरुवरून पाहिल्यास असे दिसेल, की काही काळापुरता कलीस्टो गायब झाला आहे! अर्थात गुरुवर सुद्धा घडते चंद्रग्रहण!


“आणि हीच घटना पृथ्वीवरून पाहिल्यास असे दिसेल, की काही काळापुरते कलीस्टो चंद्र थोडा faint होत जातो. आणि मग पुन्हा होता तसा तेजस्वी दिसू लागतो!


“हे पहा एका दिवसात गुरुवर घडणारी सूर्य ग्रहणे, चंद्र ग्रहणे, occults आणि transits -


“आबा, ग्रहणांचे इतके प्रकार असतील याची कल्पना नव्हती! इतर ग्रहांवरून ग्रहणे कशी दिसतात?”, सुमितने विचारले.


“सुमित, पुढच्या वेळी आपल्या सूर्य मालिकेतील इतर ग्रहांवरून दिसणारी ग्रहणे पाहू! आणि कधीतरी तुला इतर सूर्यमालिकेतील सूर्यग्रहणे सुद्धा दाखवेन!”, आबा म्हणाले.


संदर्भ –
1. Jupiter’s shadow causes the atmosphere of its volcanic moon Io to collapse – Abigail Beall
2. Jupiter’s shadow turns Io’s atmosphere to frost - Sid Perkins
Catch the Last Best Antics of Jupiter’s Moons - Bob King

- दिपाली पाटवदकर
@@AUTHORINFO_V1@@