मुंबई : दादर चैत्यभूमीवर ६ डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाला अनुसरून मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. बुधवार ५ डिसेंबरपासून ते ७ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत दादर परिसरातील विविध रस्त्यांवरून होणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर ६ डिसेंबरला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय येत असतो. त्यामुळे मुंबईच्या महत्वाच्या रस्त्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, एन सी केळकर मार्ग, गोखले रोड, टिळक ब्रीज, एस के बोले रोड या रस्त्यांवरचे वाहतूक बंद राहील. एन. एम. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हे पर्यायी रस्ते असतील. तर सेनापती बापट मार्ग, कामगार स्टेडियम, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, आदर्श नगर, फाय गार्डन, रेती बंदर, आर ए के रोड या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/