नवी दिल्ली : शीखविरोधी दंगलीसंदर्भात जन्मठेप मिळालेले काँग्रेस नेते सज्जनकुमार यांनी अखेर सोमवारी दिल्लीतील न्यायालयासमोर शरणागती पत्करली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची रवानगी मंडोली तुरुंगात करण्यात येणार आहे. त्यांच्याआधी महेंद्र यादव आणि किशन खोखर यांनीदेखील शरणागती पत्करली आहे. या दोघांना १०-१० वर्षाची शिक्षा सुनावली आहे, तर सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
संदर्भात माहितीसाठी पहा आमचा हा खास व्हिडियो
१७ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने १९८४ मध्ये दिल्लीतील कँट परिसरात ५ शिखांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत शरणागती पत्करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सज्जनकुमारच्या सुरक्षेसंदर्भात काही मागण्या मान्य केल्या. त्यांना तुरुंगात घेऊन जाण्यासाठी वेगळ्या गाडीचा बंदोबस्त करण्यात आला. तसेच तुरुंगामध्ये त्याला सर्व कैदींपासून काही अंतरावर ठेवण्यात येणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/