मुंबई : दै. मुंबई तरूण भारतच्या उपसंपादक योगिता साळवी यांना काव्यामित्र संस्थेतर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय गुणवंत पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. काव्यामित्र संस्थेतर्फे नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आली. संस्थेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त दि. १३ जानेवारी रोजी बिजलीनगर, चिंचवड येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. योगिता साळवी या मुंबई तरूण भारतमध्ये गेली चार वर्षे कार्यरत असून सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/