मुंबई : गोरेगाव पूर्वेला आरे कॉलनीजवळ नागरी निवारा परिषदेमागील डोंगराला सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग चार किलोमीटर पसरली होती. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दल आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. पण रात्री उशिरापर्यंत आग सुरू होती.
गोरेगाव येथील जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर आयटी पार्कच्या मागील डोंगरावर ही आग लागली होती. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वन विभाग, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. १०० कर्मचारी आणि १०० बिटर्स आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होते. दरम्यान, या परिसरात नागरिक जाणार नाहीत ना, याची खबरदारी घेण्यात आली होती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/