देवमाश्यावर जपानी संकट

Total Views | 34
 
 
जपानने आता ‘आयडब्ल्यूसी’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला आहे.आयडब्ल्यूसी’अंतर्गत असलेल्या सर्व देशांनी जपानशी असलेले संबंध सर्व देशांनी तोडावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे जपानला देवच सुबुद्धी देवो, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या सात पिढ्यांना तरी देवमाशांचे दर्शन होईल.


देवमासा किंवा व्हेल मासा हा कोणेएकेकाळी एखाद्या देशाची श्रीमंती दाखवणारा मासा. म्हणजे एक काळ असा होता की, देवमाश्यांवरून जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शीतयुद्धालाही सुरुवात होणार होती. म्हणूनच मग तेव्हा या देवमाशांचे प्राण वाचवण्यासाठी ‘इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ (आयडब्ल्यूसी) या स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली. याची गरज पडली कारण, दुसऱ्या महायुद्धानंतर लोकांनी आपली प्रथिनांची गरज भागविण्यासाठी देवमाशांची शिकार करायला सुरुवात केली आणि यात जपानी सर्वात अग्रेसर. जपानमध्ये आजही रात्रीच्या जेवणात देवमाशाचं मांस असल्याशिवाय जपानी लोकांना जेवण जात नाही. पण, देवमाशांची घटणारी संख्या पाहता, १९६६ साली या ‘आयडब्ल्यूसी’ची स्थापना करण्यात आली. या समितीत समाविष्ट असणाऱ्या देशांवर देवमाशाच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे अनेक देशांतील देवमाशांची अधिकृत शिकार बंद झाली. याचा फटका देवमाशाचे मांस विकणाऱ्या जपानला सर्वाधिक बसला आणि जपानने ‘आयडब्ल्यूसी’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. खरंतर २०१७ पासूनच जपानमध्ये ‘व्यावसायिक व्हेलिंग’ सुरू करण्यासाठी ‘आयडब्ल्यूसी’कडे मागणी केली होती. मात्र, या समितीकडून परवानगी न मिळाल्यामुळे अखेर २०१९ मध्ये जपानने देवमाशाच्या शिकारीसाठी पुनश्च सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

‘आयडब्ल्यूसी’ने २००२ मध्ये केलेल्या अहवालानुसार संपूर्ण जगात केवळ पाच हजार ते १२ हजारच देवमासे उरले होते. एकेकाळी ‘समुद्रसंपत्ती’ म्हणून ओळखला जाणारा देवमासा हळूहळू नामशेष होणार असल्याची चिंता ‘आयडब्ल्यूसी’ या समितीला वाटली आणि या देवमासा संवर्धनाची जागतिक मोहीम हाती घेण्यात आली. २००२ मध्ये एकट्या अंटार्क्टिकामध्ये दोन ते तीन लाख इतकी देवमाशांची संख्या होती. याव्यतिरिक्त पूर्वी उत्तरी प्रशांत, अंटार्क्टिका आणि हिंदी महासागरात केवळ दोन हजार देवमासे उरले आहेत. मात्र, अशी सगळी परिस्थिती असतानाही जपानने या समितीतून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि जुलैपासूनव्यावसायिक व्हेलिंग’ करण्याचा निर्णय घेतल्याचे जपानने जाहीर केले. ‘व्यावसायिक व्हेलिंग’ हे केवळ जपानमध्ये चालते असे नाही. या व्यवसायात ऑस्ट्रेलियाही आधी अग्रेसर होता, मात्र देवमाशांच्या संवर्धनासाठी ऑस्ट्रेलियाने देशात व्हेलिंग व्यवसायावर बंदी घातली. पण, जपानला हे असं करणं जमत नाही. कारण, जपानमध्ये व्हेलिंग व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय मानला जातो, त्यामुळे अधिकृतरित्या जपान या समितीत एवढी वर्षे असला तरी, जपानमध्ये अनधिकृतरित्या अनेकवेळा देवमाशांची शिकार केली जात होती.

 
काही महिन्यांपूर्वी सर्वात अनमोल असा मानल्या जाणाऱ्या ‘सालाना’ या देवमाशाची शिकार करण्यात आली. यामुळे जगभरातून जपानवरही टीका करण्यात आली. कहर म्हणजे, जपानने आपल्या या मोहिमेअंतर्गत ‘मिंक’ या प्रजातीच्या १२२ गर्भवती देवमाशांची शिकार केली, म्हणजे जपानने जवळजवळ ५०० देवमाशांची शिकार केली. हे अभियान जपानने विशेष सुविधांसहित चार महिने अंटार्क्टिकात सुरू केले होते, ते मार्च २०१८ मध्ये संपले. मागच्या महिन्यात जपान सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय व्हेलिंग समितीने जाहीर केलेल्या अहवालात एकूण ३३३ ‘मिंक’ जातीचे देवमासे जपानने व्हेलिंग व्यवसायात मारले. मात्र, जपानने अगदी सोज्वळपणे या अहवालानंतर आपण ही शिकार व्यवहाराकरिता नाही तर, शास्त्रज्ञांनी विशेष मोहिमेअंतर्गत देवमाशांची शिकार केल्याचे जाहीर केले. मात्र, देवमाशांच्या संवर्धनासाठी जपानच्या या वागणुकीवर टीका करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही जपानने आता ‘आयडब्ल्यूसी’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला आहे. याकरिता ऑस्ट्रेलियानेही जपानसोबत असलेले संबंध तोडून टाकण्याची धमकी दिली होती. मात्र, कोणाचेही न ऐकता, जपान व्हेलिंग व्यवसायाच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे येत्या जुलैपासून देवमाशांवर जपानचे संकट ओढवणार असले तरी, ‘आयडब्ल्यूसी’अंतर्गत असलेल्या सर्व देशांनी जपानशी असलेले संबंध सर्व देशांनी तोडावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे जपानला देवच सुबुद्धी देवो, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या सात पिढ्यांना तरी देवमाशांचे दर्शन होईल.
 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 

प्रियांका गावडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. वाचनाची आवड व क्रीडा विषयामध्ये विशेष रस. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण.

अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा साठा केला जप्त

Drugs Smuggler भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ज्यात त्यांना मोठे यश संपादन करता आले आहे, १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाईमध्ये समुद्रातून तस्करी करत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत सुमारे १८०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे औषध मेथाम्फोटामाइन असण्याची शक्यता असून यासंदर्भात अजूनही चौकशी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121