नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणण्याचे ठरवले आहे. परंतु त्यामुळे काहींसाठी व्हॉट्सअॅप कायमच बंद होणार आहे. ३१ डिसेंबर नंतर काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही. त्यामुळे जुने ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या काही मोबाईल फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. व्हॉट्सअॅपने यासंबंधी माहिती दिली असून या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिममधील काही व्हॉट्सअॅप फीचर्स कोणत्याही क्षणी बंद होतील. असे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅपने घेतलेल्या निर्णयानुसार विंडोज फोन ८.०, ब्लॅकबेरी os आणि ब्लॅकबेरी १० या फोनमधील व्हॉट्सअॅप गेल्यावर्षी ३१ डिसेंबर २०१७ रोजी बंद झाले होते.
‘या’ ऑपरेटिंग सिस्टिममध्ये नव्या वर्षात व्हॉट्सअॅप नसेल!
- नोकिया S40
- अँड्रॉइड २.३.७
- आयफोन ios7 या ऑपरेटिंग सिस्टिमवर १ फेब्रुवारी नंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही.