LIVE : मिझोराममध्ये काँग्रेसचा सुपडा साफ!

    11-Dec-2018
Total Views | 18


 


मिझोराम : देशात सध्या विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम चालू आहे. या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असली तरी मिझोराममध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रन्टला (MNF) स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत असून ४० जागांपैकी २९ जागांवर MNF आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेस अवघ्या ६ जागांवर आघाडीवर आहे. धक्कादायक म्हणजे, मुख्यमंत्री ललथनहवला यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

 

मिझोराम विधानसभेच्या ४० जागांसाठीचे २८ नोव्हेंबरला मतदान पार पडले होते. यामध्ये ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यानंतरच्या एक्सिट पोलमध्ये काँग्रेस व मिझो नॅशनल फ्रन्ट यांच्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी संघर्ष होईल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, मतमोजणीनंतर सत्ताधारी काँग्रेसला जनतेने नाकारले असून मिझो नॅशनल फ्रन्टला स्पष्ट बहुमत देऊ केल्याचे दिसत आहे.

 

२०१३च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस ४० पैकी ३४ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. याच सरकारचे मुख्यमंत्री ललथनहवला यांना चंफाई (दक्षिण) मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, भाजप १ व इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाच्या पत्नीला घेऊन झाला फरार

बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाच्या पत्नीला घेऊन झाला फरार

Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्य..

हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची टांगती तलवार

हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर ईडीची टांगती तलवार

सक्तवसुली संचालनालयाने हैदराबादचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले. २७.५ कोटी किंमतीचे शेअर्स आणि दालमिया सिमेंट्स लिमिटेड यांच्या मालकीची ३७७.२ किंमतीची जमीन तात्पुरीची जप्त केली आहे. यावर डीसीबीएलने म्हटले की, जप्त करण्यात आलेली मालमत्ता ७९३.३ कोटी किंमतीची आहे. हा जप्तीचा खटला दाखल झाल्यानंतर १४ वर्षानंतर हा खटला सुरू करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने जप्तीचा निर्णय केंद्रीय अन्वेशन ब्युरोने २०११ मध्ये भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121