वसुंधरा राजे जिंकल्या, पण...

    11-Dec-2018
Total Views | 21



दर पाच वर्षांनी सत्तापालट करणे ही राजस्थानची खासियतच आहे. गेल्यावेळी राजस्थानच्या जनतेने राज्याची धुरा वसुंधरा राजे यांच्या खांद्यावर सोपवली होती. मात्र, यावेळी परिस्थिती अगदी उलट झाली. राजस्थान आपली परंपरा कायम ठेवेल का, यावेळी ही परंपरा मोडली जाईल, असा सवाल सर्वच स्तरांतून केला जात होता. परंतु, यावेळीही राजस्थानच्या जनतेने ही परंपरा कायम ठेवत आपला कौल काँग्रेसला दिला. यामध्ये एक महत्त्वाचे कारण नाकारून चालणार नाही. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राजस्थानमधील अनेक समुदायांना आणि आपल्याच कार्यकर्त्यांना नाराज केले. त्याचाच मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसला. तर तिकीट वाटपावरून काँग्रेसने मोठी चूक केली आणि त्याचा फटकाही त्यांना बसलेला दिसतोय. सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले असले तरी, त्यांच्यातील वैयक्तिक वादही समोर आले होते आणि त्यामुळे अनेक बंडखोर नेतेही तयार होते. दरम्यान, सुरुवातीपासूनच राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला आघाडी मिळताना दिसून आली होती. गेल्या निवडणुकांमध्ये भाजपने १६३ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले होते, तर अन्य पक्षांना १६ जागांवर विजय मिळाला होता. यावेळी काँग्रेसला १०२ जागांवर, तर भाजपला ७३ आणि अन्य पक्षांना २४ जागांवर विजय मिळाला. दरम्यान, गेल्या वर्षी ११ डिसेंबर रोजीच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या होती घेतली होती. त्यामुळे वर्षपूर्तीनिमित्त त्यांना हे बक्षीस मिळाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.

 

महत्त्वाच्या निवडणुका

 

यावेळी सर्वात महत्त्वाची निवडणूक ठरली ती म्हणजे खुद्द मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मतदार संघातलीच. २००३ साली झालेल्या निवडणुकीत वसुंधरा राजे यांनी सचिन पायलट यांच्या मातोश्री रमा पायलट यांचा २७ हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे यावेळी त्यांच्याविरोधात पायलट यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. त्याचीच परिणती म्हणून राहुल गांधी यांनी आपली पहिली सभा झालावाड-झालरापाटन मतदारसंघात घेतली होती. मात्र, याचा फारसा परिणाम झाला नाही. वसुंधरा राजे यांनी पुन्हा एकदा विजय आपल्या पदरी खेचून आणला. त्या झालरापाटन मतदारसंघातून २७ हजार ९२ मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसने वसुंधरा राजेंच्या विरोधात भाजप नेते जसवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांना मैदानात उतरवले होते. मात्र त्याचा वसुंधरा यांच्यावर कोणताही फरक पडला नाही, तर दुसरीकडे यातील राजस्थानमध्ये विजय आपल्या जवळ खेचून आणणाऱ्या लोकांमध्ये सचिन पायलट यांचाही मोलाचा वाटा होता. पायलट यांचा टोंक मतदार संघ हा मुस्लीम बहुल असल्याचे मानले जाते. दरम्यान, भाजपनेही युनूस खान यांना सचिन पायलट यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते, तर बसपतर्फे मोहम्मद अली यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या परिस्थितीतही पायलट यांनी विजय आपल्या जवळ खेचून आणला. टोंक या विधानसभा क्षेत्रात जवळपास ५० हजार मुस्लीम मतदार असून ते काँग्रेसची व्होटबँक मानले जातात. याशिवाय ३० हजार गुर्जर, ३५ हजार एससी आणि १५ हजार माळी समाजाचे मतदार आहेत.

 

सिंधी मतदारांचा प्रभाव

 

अजमेरमध्ये सिंधी मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. तर संपूर्ण राजस्थानमध्ये सिंधी मतदारांची संख्या ५ लाखांच्या आसपास आहे. या ठिकाणची महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी कोणत्याही पक्षाकडून कोणाला उमेदवारी देण्यात येईल हे पक्ष नाही तर सिंधी समाजाची सिंधी सत्कार समिती ठरवत असते. त्यातच कोणत्याही पक्षाने ही बाब नाकारल्यास संपूर्ण सिंधी समाज एकत्र येऊन आपला अपक्ष उमेदवार उभा करून त्यांना निवडून देतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121