पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेत एकूण ३४२ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात झाली आहे. नुकत्याच लागू झालेल्या मराठा आरक्षणानुसार, भरतीमध्ये मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गातून १६ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. एकूण ३४२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
भरतीची पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी होणार असून मुख्य परीक्षा १३, १४ आणि १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात येईल. परीक्षेसाठी ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उपजिल्हाधिकारी पदासाठी ४०, पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त पदासाठी ३४, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा पदासाठी १६, उद्योग उप संचालक, तांत्रिक पदाच्या २ तसेच तहसिलदार पदाच्या ७७ जागा, उपशिक्षणाधिकारी अथवा महाराष्ट्र शिक्षण सेवा पदाच्या २५ जागा असणार आहेत.
सहायक प्रादेशिक परीवहन अधिकारी ०३ जागा, कक्ष अधिकारी १६ जागा, सहायक गट विकास ११ जागा, उद्योग अधिकारी, तांत्रिक ०५ जागा, तसेच नायब तहसिलदार ११३ अशा विविध पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/