एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

    05-Nov-2018
Total Views | 26


 

ठाणे : अंबरनाथ पश्चिमेकडील मोरीवली एमआयडीसी परिसरात असलेल्या पेसिया केमिकल कंपनीत दुपारी भीषण आग लागली. एका रासायनिक ड्रमचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्रार्थमिक माहिती मिळत आहे. अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे कंपनीत ठेवलेला लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. तर कंपनीतील तीन कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

आगीची माहिती मिळताच अंबरनाथ नगरपरिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर आनंदनगर एमआयडीसी, कल्याण डोंबिवली व उल्हासनगर येथील अग्निशमन दलही सदर आग विझविण्यासाठी पोहचले होते. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले असून यामुळे मोठा अनर्थ टळला.

 
 
 
 
 

कंपनीत लागलेल्या आगीमुळे केमिकलने भीषण पेट घेतल्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या आगीच्या धुराचे लोट दुरवर पसरले होते. ज्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळवल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121