अंबरनाथच्या डम्पिंगची धग कमी करा

    26-Nov-2018
Total Views | 31



अंबरनाथ : गेल्या अनेक दिवसांपासून अंबरनाथमध्ये धुमसणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडमधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांना त्रास होत आहे, तो त्रास कमी करून धग कमी करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना हरित लवादाने अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथच्या डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत, याबाबत राष्ट्रीय हरित लवादाचे सदस्य व सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. पी. देवधर यांनी सोमवारी अंबरनाथ नगरपालिकेला भेट दिली. या भेटीत डम्पिंग ग्राऊंड आणि कचऱ्याचे विलगीकरण याची माहिती जाणून घेतली. यावेळी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, मुख्याधिकारी देविदास पवार यांनी न्या. देवधर यांचे स्वागत केले.

 

अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात असलेल्या डम्पिंग ग्राऊंडला आग लागून त्यातून येणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. यामुळे मोरिवली आणि परिसराला डम्पिंगमधून निघणाऱ्या धुराच्या त्रासाने विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यात ऐन दिवाळीत अंबरनाथ सिटिझन फोरमच्या वतीने या धुराच्या त्रासाविरोधात नागरिकांनी मानवी साखळी करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर न्या. देवधर यांनी सोमवारी अंबरनाथ नगरपालिकेला भेट दिली. याशिवाय नगरपालिकेच्या प्रस्तावित डम्पिंग ग्राऊंडला भेट देऊन पाहणी केली.

 

सध्याच्या हवामानामुळे अंबरनाथच्या डम्पिंग ग्राऊंडला आग लागत आहे. मात्र लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी रोज सायंकाळी तीन टँकरद्वारे पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात या ठिकाणी ३३ एकर जागेत डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्यात येणार आहे.”

 

देविदास पवार,

मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121