अयोध्या भगव्याने दुमदुमली...

    24-Nov-2018
Total Views | 15


 


अयोध्या : चलो अयोध्येचा नारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबियांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा हा अयोध्या दौरा असणार असून त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे हे दोघे उपस्थित आहेत. तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात हजारो शिवसैनिक अयोध्येत जमा झाले आहेत. उद्धव ठाकरे संत महंतांचे आशीर्वाद घेणार असून आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्याहस्‍ते शरयूची महाआरती होणार आहे.

 

विहिंपने बोलावली धर्मसभा

 

राम मंदिर बांधण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी विहिंपने उद्या धर्मसभा बोलावली आहे. यासाठी देशभरातून जवळपास २ लाख लोक येणार असल्याचा अंदाज आहे. ही धर्मसभा यशस्वी होण्यासाठी हजारो कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तर ही शेवटीची धर्मसभा असल्याचे विहिंपने म्हटले आहे.

 

मोठा फौजफाटा तैनात

 

शिवसेनेचा आज अयोध्येत असलेला कार्यक्रम व उद्या विश्व हिंदू परिषदेची धर्मसभेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ७० हजार सुरक्षा जवान या भागांत तैनात आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीला जलद कृती दल आणि राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात केल्या गेल्या असून अयोध्यावर ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर असणार आहे.

 

कलम १४४ लागू

 

आज आणि उद्या होत असलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. यानुसार अयोध्यात कुठेही परवानगीविना कार्यक्रम किंवा सभा आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 

व्यापाऱ्यांचा विरोध मावळला

 

शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला स्थानिक व्यापारी संघटनानी विरोध केला होता. मात्र व्यापारी संघटनेने काल रात्री अचानक आपली भूमिका बदलली. शिवसेना व उद्धव ठाकरे यांचा दौरा उत्तर भारतीयांच्या विरोधात असल्याचा गैरसमज झाला होता. मात्र आमचा गैरसमज दूर झाला असून उद्धव ठाकरे यांच्यासह इतर सर्व नेत्यांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार असल्याचे या संघटनेतर्फे सांगण्यात आले.

 

दरम्यान, आज आणि उद्या होत असलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अयोध्येमध्ये लष्कर तैनात करण्याची मागणी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121