पाचोरा येथे किसान कृषी प्रदर्शनात उपस्थित मार्गदर्शक, मान्यवरांचासूर
पाचोरा :
पाचोरा-भडगाव मतदार संघातील शेतकर्यांसाठी पाहिलांदाच मतदार संघात असा कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती व अमोल शिंदे यांच्या वतीने करण्यात आला. किसान कृषी प्रदर्शनात आधुनिक पध्दतीची शेती काळाची गरज असल्याचा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली खा. ए टी पाटील यांनी केले. यावेळी सभापती सतीश शिंदे ,अमोल शिंदे ,उपसभापती विश्वासराव भोसले, प.स. सभापती बन्सीलाल पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार बी.ए.कापसे,उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड, जि.प.सदस्य मधुकर काटे, सुभाष पाटील, डॉ संजीव पाटील, प्रफुल्ल संघवी, नीरज मुनोत, डी.एम.पाटील उपस्थित होते.
ह्या कृषी प्रदर्शनांमध्ये शेतकर्यांसाठी लागणारे साहित्यामध्ये अत्याधुनिक असे मिनी ट्रॅक्टर पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील एक व्यवसायिकाने तयार केले आहे. ह्या ट्रॅक्टरकडे सर्व शेतकर्यांचे लक्ष लागले होते. त्याचबरोबर संपूर्ण महिला बचत गटाच्या माध्यमातून स्टॉल लावण्यात आले आहे. त्यात नाष्ट्यापासून जे जेवणापर्यंतची सोय ही बचतगटांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
डिजिटल इंडियाच्या ह्या युगात वाढते पेट्रोलचे दर लक्षात घेता त्यावर मात कशी करता येईल. यासाठी संपूर्ण भारत देशात बॅटरीवर चालणारी वाहने दिसून येत आहेत, याचेच एक उदाहरण पाचोरा येथील कृषी प्रदर्शनामध्ये बॅटरीवर चालणार्या दोन चाकी मोटर सायकल व रिक्षाचे स्टॉल देखील येथे लावण्यात आले आहे.
पाचोरा तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी ढेपले ,शासकीय योजना काय व कश्या व त्याचा फायदा काय यासाठीही विविध शासकीय विभागामार्फत स्टॉल लावण्यात आले आहेत.
नाबार्डकडून मिळणार्या योजनांसाठी देखील येथे स्टॉल उपलब्ध करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पाण्याची असलेली कमतरता आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती या पारंपारिक शेती आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून शेतकर्यांना आधुनिक शेती व तंत्रज्ञान तसेच जोडव्यवसाय याची माहिती द्यावी.
यासाठी किसान कृषी प्रदर्शनाचे चर्चासत्र व आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती देणारे स्टॉल व अॅग्रो फिल्म फेस्टिवल, एक गुंठे शेडनेट हाऊस, व विविध पिकांच्या आधुनिक शेतीचे लाईव्ह मॉडेल प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
यासोबतच प्रयोगशील शेतकर्यांचा सन्मान सोहळा, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह मदत व महा राजस्व अभियानाअंतर्गत विविध शासकीय योजनांचे नाव नोंदणी व तात्काळ दाखले वाटप आणि मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय वाघ व उदघाटक म्हणून खा. ए.टी.पाटील उपस्थित होते. अमोलभाऊ शिंदे यांनी परिसरातील सर्व शेतकरी वर्गाला वाढदिवस निमित्ताने एक अनोखी भेट दिली आहे.
अमोल शिंदे यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात म्हणाले की,, पुणे मुंबई नाशिक यासारख्या ठिकाणी जाऊन ग्रामीण भागातील शेतकर्याला एवढ्या दूर जाणे शक्य होत नाही म्हणून पाचोरा सारख्या शहरामध्ये आपण ह्या कंपन्याना बोलवून शेतकर्यांसाठी त्याच्या हितासाठी काय फायदा करता येईल यासाठी माझा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
सभापती बन्सीलाल पाटील यांनी देखील मार्गदर्शन करताना सांगितले कि पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज पर्यंत भरपूर सत्ता आल्या व गेल्या परंतु सतीष शिंदे हे सभापती झाल्यानंतर काका व पुतणे यांच्या संकल्पनेतून भव्य असे कृषी प्रदर्शन प्रथमच आयोजित करण्यात आले असून याचा सर्व परिसरातील शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले
. तसेच युवानेते अमोल शिंदे यांच्या वर वाढदिवसानिमित्त प्रदर्शनातच शहरवाशी व ग्रामस्थतर्फे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
या कार्यक्रमास जि प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, अटल पणन योजनेचे ब्रँड अँबेसॅटर व व्याख्याते गणेश शिंदे, पारोळा लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी धावती भेट दिली, त्याचबरोबर व्यखाते शिलाताई मोहिते,अर्चनाताई पाटील, रेखाताई पाटील, विजयाताई शिंदे, नरेंद्र पाटील, नंदू सोमवंशी, प्रदीप पाटील, हेमंत मराठे सचिन पाटील,सुदाम पाटील, डॉ देशमुख, शांतीलाल मोर, बोरसे अप्पा पाटी,ल प्रफुल पाटील, नारायण अग्रवाल या सह सर्व जि. प. सदस्य व पं. स. सदस्य उपस्थित होते .