चांदिवलीकर घेणार मोकळा श्वास : पूनम महाजन

    01-Nov-2018
Total Views | 31
 

 स्व. श्री.‘प्रमोद महाजन मनोरंजन उद्याना’चे लोकार्पण

 

मुंबई : “मुंबईकरांचे जीवन हे धावपळीचे आहे. लोकांना मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळत नाही. चांदिवलीत ‘स्व. श्री. प्रमोद महाजन मनोरंजन उद्यान’ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे चांदिवलीकरांना मोकळा श्वास घेता येईल,” असे प्रतिपादन भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा.पूनम महाजन यांनी केले.
 

कुर्ला परिसरात फिनिक्स मॉलच्या पाठीमागे ‘प्रमोद महाजन मनोरंजन उद्यान’ उभारण्यात आले आहे. प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना पूनम महाजन म्हणाल्या की, “मुंबईकरांना खुले आकाश पाहता येत नाही. या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा मिळत नाही. परंतु येथे अपेक्षेपेक्षा सुंदर उद्यान उभारण्यात आले आहे. अनेक ठिकाणी केवळ उभारायचे म्हणून उद्यान उभारले जाते. परंतु हे उद्यान फक्त लोकांसाठी काम करायचे म्हणून उभारले आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना विरंगुळा मिळणार आहे. तसेच प्रमोद महाजन यांचे या उद्यानाला नाव देण्यात आले आहे. त्यांचा स्वभाव स्वच्छ आणि काटेकोर होता, त्यामुळे उद्यानही स्वच्छ ठेवा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

 
 

चांदिवलीतील कुर्ला परिसरात फिनिक्स मॉलच्या पाठीमागे ‘प्रमोद महाजन मनोरंजन उद्यान’ उभारण्यात आले आहे. येथे पूर्वी मुकुंद कंपनी होती. दहा वर्षांपूर्वी येथे फिनिक्स मॉल बांधण्यात आला. मुंबई महापलिकेच्या नियमानुसार बांधकाम करताना काही जागा उद्यानासाठी सोडणे आवश्यक आहे. त्यानुसार फिनिक्स मॉल बांधताना पाठीमागे उद्यानासाठी जागा सोडण्यात आली. स्थानिक नगरसेवक हरीश भांर्दिगे यांनी सातत्याने पाठपुरावा करून येथे हे उद्यान उभारले. २०१६ साली खा. पूनम महाजन यांच्या हस्ते या उद्यानाचे भूमिपूजन झाले होते. दोन वर्षांनी २०१८ साली त्याचे लोकार्पण झाले. कुर्ला विभागात हे एकमेव उद्यान आहे. या उद्यानाचा लहान मुलांनापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना फायदा होणार आहे. या उद्यानात निवांत बसू शकतो, विरंगुळ्यासाठी चांगली जागा आहे, तर मुलांसाठी खेळायला खेळणी आहेत. या उद्यानात चार प्लॉट आहेत, चारही प्लॉटवर जॉगिंगसाठी जागा आहे. उद्यानात रंगीत फवारे लावले आहेत. येथे स्टॉर्म वॉटर हार्वेस्टींग सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे. विजेची बचत व्हावी म्हणून सौरऊर्जेचेखांब बसविले जाणार आहेत, असे नगरसेवक हरीश भांदिर्गे यांनी सांगितले. या उद्यानासाठी पूनम महाजन यांनी केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर पाठपुरावाही केला. त्यामुळे हे उद्यान तयार होण्याच्या कामाला गती मिळाली, असेही भांदिर्गे म्हणाले.

 

उद्यान रस्त्यालगत हवे होते

 

सर्व उद्याने रस्त्यालगत असतात. त्यामुळे नागरिकांना जाण्यास सोपे होते. परंतु हे उद्यान एका बाजूला असल्याने जास्त लोकांना येता येत नाही,” असे सांगून “नागरिकांना माहितीसाठी एलबीएस मार्गावर पालिकेने ‘प्रमोद महाजन मनोरंजन उद्यान’ असा बोर्ड लावावा,” असेही नगसेवक हरीश भांदिर्गे म्हणाले.
 

मदरसासाठी सहा महिने काम थांबविले

 

प्रमोद महाजन मनोरंजन उद्यानाच्या एका बाजूला मदरसाचे बांधकाम सुरू होते. एका बाजूला चिंचोळा रस्ता असल्यामुळे बांधकाम साहित्य नेण्यात अडचणी येत होत्या, तर या उद्यानातून साहित्य नेण्यासाठी जागा सोडणे, हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे हरीश भांदिर्गे यांनी पुढाकार घेऊन मुस्लीम बांधवाना सहकार्य करण्यासाठी उद्यानाचे काम सहा महिने बंद ठेऊन मदरसासाठी साहित्य ने-आण करण्यासाठी रस्ता करून दिला.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121