पदार्पणाच्या कसोटीतच 'पृथ्वी'चे शतक

    04-Oct-2018
Total Views | 25


 

 

राजकोट : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील राजकोट येथील कसोटीत सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉने पदार्पण केले आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत त्याने दमदार शतक झळकावले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत त्याने ९९ चेंडूंमध्ये त्याने १०१ धावा पटकावल्या, यात १५ चौकारांचा समावेश होता. पदार्पणातच शतक करणारा तो भारताचा १५ वा कसोटी खेळाडू ठरला. त्याच्या धमाकेदार ऐतिहासिक खेळीचे जगभरातून कौतुक होत आहे. खुद्द ICC ने देखील शॉचे अभिनंदन केले आहे.

 
 

२९३ वा कसोटी खेळाडू

 

१८ वर्षाचा पृथ्वी शॉ भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा २९३ वा खेळाडू ठरला आहे. इतक्या लहान वयात कसोटीत पदार्पण करणारा पृथ्वी हा भारतचा पहिला क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी १९८९ मध्ये सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121