मूळ नाव: नझ्झारेनो ऍन्टोनिओ टासोन (Nazzareno Antonio Tassone)
युद्धातील टोपण नाव: अगिर अरारत (Agir Ararat)
आईचे नाव: टिना (Tina)
वडिलांचे नाव: मार्क (Mark)
जन्मदेशः न्यू मार्केट, ओन्टारिओ, कॅनडा
हौतात्म दिन: २१ डिसेंबर २०१६
हुतात्मा स्थळः रेका कॅबर झेर्बी (Reqa. Caber Xerbî)
मूळ नाव: रायन लॉक (Ryan Lock)
युद्धातील टोपण नाव: ब्रेक्सवेदन गिवारा (Berxwedan Gîvara)
आईचे नाव: कॅथरिन (Cathrin)
वडिलांचे नाव: जॉन (John)
जन्मदेशः चिचेस्टर, युके
हौतात्म दिन: २१ डिसेंबर २०१६
हुतात्मा स्थळः रेका कॅबर झेर्बी (Reqa. Caber Xerbî)
SDF- Syrian Democratic Forces मध्ये वायपीजी सहभागी आहे. रक्का शहर इसिसकडून ताब्यात घ्यायच्या मोहिमेमध्ये वायपीजी SDF सोबत कार्यरत आहे. ह्या दरम्यानच नझ्झारेनो ऍन्टोनिओ टासोन व रायन लॉक ह्यांचा २१ डिसेंबर २०१६ हुतात्मा आले. नझ्झारेनो ऍन्टोनिओ टासोन म्हणजे अगिर अरारत असे युद्धातील टोपण नाव असलेला मूळचा कॅनडावासी होता तर रायन लॉक म्हणजे ब्रेक्सवेदन गिवारा असे युद्धातील टोपण नाव असलेला मूळचा ब्रिटिश होता.
मूळ नाव: रॉबर्ट ग्रोडत (Robert Grodt)
युद्धातील टोपण नाव: डेमहट गोल्डमन (Demhat Goldman)
आईचे नाव: टॅमी (Tammy)
वडिलांचे नाव: वेन (Wayne)
जन्मदेशः कॅलिफोर्निया
हौतात्म दिन: ६ जुलै २०१७
हुतात्मा स्थळः रक्का
मूळ नाव: मलिक एल एली (Malik El Elî)
युद्धातील टोपण नाव: लॉरेन्स अमेद (Lorens Amed)
आईचे नाव: फात्मा (Fatma)
वडिलांचे नाव: फायिझ (Fayiz)
जन्मदेशः हेसके
हौतात्म दिन: ६ जुलै २०१७
हुतात्मा स्थळः रक्का
मूळ नाव: नुरेदिन युनिस (Nuredîn Yunis)
युद्धातील टोपण नाव: डिलझर झॅप (Dilşêr Zap)
आईचे नाव: बेरिवान (Bêrîvan)
वडिलांचे नाव: लॉकमन (Loqman)
जन्मदेशः रक्का
हौतात्म दिन: ३ जुलै २०१७
हुतात्मा स्थळः कोबान
मूळ नाव: कासिम एल सलिह (Casim El Salih)
युद्धातील टोपण नाव: मुराद टिल टमिर (Murad Til Temir)
आईचे नाव: सेभा (Sebha)
वडिलांचे नाव: टॅहा (Taha)
जन्मदेशः टिल टमिर
हौतात्म दिन: २९ जून २०१७
हुतात्मा स्थळः रक्का
मूळ नाव: रोडी डेयसि (Rodî Deysie)
युद्धातील टोपण नाव: निकोलस वार्डन (Nicholas Warden)
आईचे नाव: डॉन हॉल (Dawn Hall)
वडिलांचे नाव: मार्क (Mark)
जन्मदेशः फोर्ट स्टुअर्ट, जॉर्जिया
हौतात्म दिन: ५ जुलै २०१७
हुतात्मा स्थळः रक्का
मूळ नाव: सोरेस कुडी (Şoreş Cudî)
युद्धातील टोपण नाव: एधेम मेहमुद (Edhem Mehmûd)
आईचे नाव: एमिना (Emîna)
वडिलांचे नाव: नेबो (Nebo)
जन्मदेशः सेरेकानिये
हौतात्म दिन: ७ जुलै २०१७
हुतात्मा स्थळः रक्का
मूळ नाव: सोरो झिनार (Soro Zinar)
युद्धातील टोपण नाव: ल्यूक रूट्टर (Luke Rutter)
आईचे नाव: कॅरोलिन (Caroline)
वडिलांचे नाव: आंद्रे (Andre)
जन्मदेशः बिर्केनहेड
हौतात्म दिन: ५ जुलै २०१७
हुतात्मा स्थळः रक्का
झेरिब रेशो
मूळ नाव: झेरिब रेशो (Xerîb Resho)
युद्धातील टोपण नाव: झेरिब वेलात (Xerîb Welat)
आईचे नाव: लेमिया (Lemiya)
वडिलांचे नाव: हेमस (Hemûş)
जन्मदेशः अफ्रिन
जन्मवर्ष: १९९२
हौतात्म दिन: २० एप्रिल २०१७
हुतात्मा स्थळः रक्का, एम एल- तेनेक
देशभक्त कुटूंबात जन्मलेल्या झेरिब रेशोने कृशी विषयात शिक्षण घेतले होते. वयाच्या २० व्या वर्षी २०१२ ला रोजावा क्रांतीमध्ये झेरिब रेशोने बंदूक घेऊन वायपीजीमध्ये सामील झाला. सेरेकानिये व रिमेला पाशा येथील युद्धभूमीवर त्याने बंदूकीच्या सहाय्याने पराक्रम गाजवला. पण केवळ बंदूकीतून गाजवेलेला पराक्रम त्याला समाधान देत नव्हताअ, म्हणून मग त्यांना कॅमेरा व लेखणी हाता घेतली आणि २०१३ पत्रकारितेत प्रवेश केला. आता रायफल, कॅमेरा व लेखणी या तीन शस्त्रांसह तो युद्धभूमीवर अविश्रांतपणे फिरू लागला. रोजावामधील युद्धाची त्याने जगाला ओळख करून दिली. ह्या चळवळीने YPG Press Center ची मुहूर्तमेढ रोवली. कूर्दीश प्रेसमध्ये तो छायाचित्र व दृक- श्राव्य माध्यमातून कूर्दांचा इतिहास मांडत होता.
२० एप्रिल २०१७ ला रक्कामधील एम एल- तेनेक ह्या गावामध्ये सुरुंग स्फोटात झेरिब रेशो हुतात्मा झाला.२ जगाने दुर्लक्षिलेल्या रोजावा क्रांती व इसिसविरोधातील कूर्दांच्या पराक्रमाकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यात झेरिब रेशोचा सिंहाचा वाटा होता. केवळ युद्धपत्रकार म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष रणांगणावरही शस्त्राने पराक्रम गाजवेलेला असल्यामुळे त्याच्या युद्ध- पत्रकारितेत कृत्रिमपणा न जाणवता स्वानुभवामुळे नैसर्गिक व वास्तव मांडणी दिसून येत असे.
पाउलो टॉड
मूळ नाव: पाउलो टॉड (Paolo Todd)
युद्धातील टोपण नाव: कावा अमेद (Kawa Amed)
आईचे नाव: रचेल टॉड (Rachel Todd)
वडिलांचे नाव: डेव्हिड टॉड (David Todd)
जन्मदेशः लॉस अँजेलिस, अमेरिका
हौतात्म दिन: १५ जानेवारी २०१७
हुतात्मा स्थळः रक्का, सिवेदिया गावात
अफ्रिन युद्धातील हुतात्मा
मूळ नाव: सॅम्युएल प्रॅडा लिऑन (Samuel Prada Leon)
युद्धातील टोपण नाव: बरान गॅलिशिया(Baran Galicia)
जन्मदेशः ऑरेंझ
जन्मवर्षः १९९३
हौतात्म दिन: १० फेब्रुवारी २०१८
हुतात्मा स्थळः अफ्रिन
मूळ नाव: ऑलिव्हर फ्रॅकोस जीन ल क्लेंच (Olivier François Jean Le Clainche)
युद्धातील टोपण नाव: केंडाल ब्रेझ (Kendal Breizh)
जन्मदेशः मॅलेस्ट्रॉईट
जन्मवर्षः १९७७
हौतात्म दिन: १० फेब्रुवारी २०१८
हुतात्मा स्थळः अफ्रिन
मूळ नाव: जोएर्ड हिगर (Sjoerd Heeger)
युद्धातील टोपण नाव: बरान ससोन (Baran Sason)
जन्मदेशः नेदरलँड
जन्मवर्षः १९९३
हौतात्म दिन: १२ फेब्रुवारी २०१८
हुतात्मा स्थळः देर इझ्झोर
एकंदरित पाहता असे लक्षात येते की ह्यातील बहुतांश हुतात्मा झालेले सैनिक हे परदेशी व तरूण होते, काहींनी तर तिशी पण पूर्ण केली नव्हती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/