नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एक ट्विट केले आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या ट्विटरवर अकाऊंटवर दररोज त्यांच्या फॉलॉअर्सना विविध अपडेट देतच असतात. गुरुवारी दुपारी त्यांनी असेच एक ट्विट केले मात्र, अनेकांना त्याचा उलगडा झाला नाही. हे ट्विट कोरियन भाषेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच सेऊल पीस पुरस्कार जाहिर झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील योगदानाबाबत हा पुरस्कार दिला जातो. सेऊल हा पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय आहेत. त्यानिमित्त त्यांनी कोरियन भाषेत हे ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले कि, सियोल पीस प्राइज कल्चरल फाउंडेशनचे गौरवशाली पुरस्कार म्हणून मी मनापासून आभार मानतो.मला वाटते की हा एक नवीन भारतासाठी एक बक्षीस आहे जो सर्व मानवजातीच्या आनंद, विकास, शांती आणि समृद्धीस हातभार लावतो. मी सर्व भारतीयांच्या वतीने हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारतो.
अर्थव्यवस्थेतील दरी मिटवण्याचे प्रयत्न
भ्रष्टाचाराला आळा
वैश्विक सहयोग
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/