अमृतसर: दिल्ली येथे पोलीस हुतात्मा दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या राष्ट्रीय पोलिस स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र अमृतसरमध्ये पोलिसांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. अमृतसर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या निषेधार्थ शनिवारपासून स्थानिक अपघात झालेल्या जागी एकत्र आले होते. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत त्यांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यांनी रेल्वे पायरीवर बसून या अपघाताचा निषेध दर्शविला. त्यानंतर तिथल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
“शनिवारपासून येथे स्थानिकांनी आंदोलनाला सुरुवात केली असून रविवारी संध्याकाळपर्यंत वाटेवर शांत होईल अशी आशा आहे.” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. “पंजाब पोलिसांनी जमावाला आवरण्यासाठी पोलिसांसह रॅपिड अॅक्शन फोर्स आणि कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सांगितल्यानुसार या अपघातात ५९ जण ठार झाले असून ४० जणांची ओळख पटली आहे.” असेही त्यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/