तिचा सांस्कृतिक वारसा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018   
Total Views |



‘स्वयंपाक’- स्त्रीजीवन सुंदर व समृद्ध करणारा सांस्कृतिक वारसा

 

असाच भन्नाट वारसा आहे - लोणच्यांचा! वेगवेगळी फळे, भाज्या अधिक काळासाठी टिकवून त्यांचे सेवन करता यावे म्हणून त्यावर केलेला संस्कार. आंब्याचे, हळदीचे, मिरचीचे, करवंदाचे, आल्याचे, लसणीचे, आवळ्याचे, कारल्याचे आणि कितीतरी. आंबट, खारट, तिखट, उग्र, गोड अशा अनेक चवींचे स्वादिष्ट मिश्रण! भरपूर टिकणारे आणि कधीही कालवण म्हणून घेता येणारे. वर्षभर टिकणाऱ्या पदार्थांमध्ये उन्हाळ्यात केले जाणारे, विविध पापड, कुरडई, सांडगे, मेतकूट आणि शेवया हा साठवणीच्या पदार्थांचा ठेवा.

 

स्वयंपाकाची सुरुवात करताना रोज मसाल्याचा डबा उघडला की, त्यातील विविध रंगांनी आणि हळद, हिंग, मसाल्याच्या मिश्र वासांनी, डोळे आणि नाक खूश होतात. फोडणी ही एक साधीशी कृती. पण त्या कृतीतच प्रत्येक पदार्थाचा जन्म होतो. फोडणी कशी होते, यावर त्या पदार्थाची चव आणि गंध ठरतो. फोडणी हा गृहिणीला मिळालेला एक चविष्ट सांस्कृतिक वारसा आहे. फोडणीसाठी तेल वापरायचे की तूप? किती तापू द्यायचे? मोहरी कधी घालायची? लाल मिरचीची, लसणाची, तूप-जिऱ्या’ची, मेथीचीकी हिंगाची फोडणी? अख्खी मिरी की मीरपूड? अख्खी मिरची घालायची की ठेचून घालायची? उडदाची डाळ की हरबऱ्याची डाळ? तमालपत्र, शहाजिरे, लवंग की दालचिनी? आलं घालायचे का? तीळ, खोबरे किंवा दाणे घालायचे का? एका सध्या फोडणीत खूप विविधता आहे आणि प्रत्येक पदार्थाची स्वत:ची खास फोडणी आहे. फोडणीचा जन्म पदार्थाच्या आधी तर आहेच. पण काही पदार्थ पूर्ण झाल्यावर वरून दिली जाणारी झणझणीत लाल मिरचीची फोडणी म्हणजे निव्वळ सुख! पूर्वीच्या लोकांनी कितीतरी प्रयोग करून हा फोडणीचा शोध आणि मिसळीचाडबा तयार केला असेल. चव हा त्यातील एक भाग झाला. पदार्थाचा रंग हा अजून एक भाग झाला आणि आरोग्य हा त्याचा अजून एक भाग. रोज हळद पोटात जावी, गरम तेलात फुटलेली थोडी मोहरी पोटात जावी यासाठी फोडणीची परंपरा तयार झाली असेल का? या फोडणीच्या वारशाने Natural Steroid, a­ntiseptic, Painkiller इत्यादी गुण असलेली हळद आपोआपच आपल्या आहारात समाविष्ट झाली आहे.

 

फोडणी ही भारतीय स्वयंपाकात जितकी unique कृती आहे, तितकीच unique आहे दह्या-दुभत्याची परंपरा. दुधावर केले जाणारे संस्कार. उतू येईपर्यंत दूध तापवणे. मग लहान वाटीत देवाला दुध-साखरेचा नैवेद्य. त्यानंतर कोमट दुधाला विरजण लावून घट्ट दही तयार करणे हे जगभरात कुठेही पाहायला मिळत नाही. सायीचे दही, साधे गोड दही, मटक्यातील दही, चक्का, वेलचीयुक्त श्रीखंड ही त्याची विविध रुपे. दह्याचे ताक, मसाला ताक, लस्सी, पीयुष, कढी असे ताकाचे प्रकार. दुधावरच्या सायीवर बायकांचे विशेष प्रेम आणि त्यावर खास संस्कार. रोजची साय साठवणे. त्याला विरजण लावणे. त्याचे दही लागल्यावर भरपूर घुसळून लोणी काढणे. लोण्याचा गोळा ताकापासून वेगळा करून पाण्यात ठेवणे. मग छोट्याशा वाटीत कृष्णाला लोणी-साखरेचा नवैद्य दाखवणे. गरम थालीपीठ किंवा भाकरीवरील ताज्या लोण्याचा गोळा म्हणजे स्वर्गच! आणि बच्चा मंडळींनीन ताव मारून झाल्यावर उरलेले लोणी कढवून त्याचे तूप करणे. त्यातील पौष्टिक तत्त्वांसाठी, चवीसाठी आणि औषधासाठी तूप वापरले जाते. दुध - दही - लोणी - तूप ही परंपरा हजारो वर्ष भारतात रूढ आहे आणि फक्त भारतातच रूढ आहे. इतर कुठल्याही देशात रोजच्या रोज दही लावणे हा प्रकार नाही. आहार संशोधकांना प्रयोगांती दही हे पचनसंस्थेसाठी चांगले असते, असा शोध लागला. तेव्हापासून पाश्चिमात्य जगात Probiotic Yoghurt खाण्यावर भर आहे. मात्र, हे दही विकत आणावयाचे असते. आपल्याला मात्र आयतच हा Probiotic, Vitamin Rich वगैरे पदार्थ वारशात मिळाला आहे.

 

असाच भन्नाट वारसा आहे - लोणच्यांचा! वेगवेगळी फळे, भाज्या अधिक काळासाठी टिकवून त्यांचे सेवन करता यावे म्हणून त्यावर केलेला संस्कार. आंब्याचे, हळदीचे, मिरचीचे, करवंदाचे, आल्याचे, लसणीचे, आवळ्याचे, कारल्याचे आणि कितीतरी. आंबट, खारट, तिखट, उग्र, गोड अशा अनेक चवींचे स्वादिष्ट मिश्रण! भरपूर टिकणारे आणि कधीही कालवण म्हणून घेता येणारे. वर्षभर टिकणाऱ्या पदार्थांमध्ये उन्हाळ्यात केले जाणारे, विविध पापड, कुरडई, सांडगे, मेतकूट आणि शेवया हा साठवणीच्या पदार्थांचा ठेवा. त्या शिवाय वारशाने आलेल्या खास पदार्थांची यादी लांबच लांब आहे. श्रावणातील पुरणाच्या पोळीने सुरू होणारी ही यादी, गणपतीतील उकडीचे मोदक, ऋषिपंचमीची भाजी, गौरीच्या जेवणाची भाजी, दिवाळीतील फराळ, भोगीची भाजी, संक्रांतीची गुळाची पोळी, तीळगुळाचे लाडू अशी वळणे घेत ही यादी कांदेनवमीच्या भजीपर्यंत चालते. अक्षरश: न संपणारी यादी आहे. असा खाद्य संस्कृतीचा वारसा भाग्यवंतांनाच मिळतो. आईकडून किंवा सासूकडून आलेला स्वादिष्ट वारसा चालवणाऱ्या घरोघरच्या अन्नपूर्णेला सलाम!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@