‘मिस वर्ल्ड’मध्ये आता तृतीय पंथीय

    11-Oct-2018   
Total Views | 15


 

मिस वर्ल्ड’ या ‘ब्युटी पेजंट’मध्ये आता तृतीयपंथीही अधिकृतपणे सहभागी होऊ शकतात, असा निर्णय ‘मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन’च्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले यांनी घेतला. स्पेनची अँजेला पॉन्स ही ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी होणारी पहिली तृतीयपंथी होती. त्यापूर्वी २०१२ मध्ये कॅनडाच्या जेना तालाकोवाने ‘मिस वर्ल्ड’मध्ये भाग घेतला होता, पण तिला अपात्र ठरवले गेले.

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले यांचा निर्णय संवेदनशील माणुसकीच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र, पुढे या निर्णयामध्ये असाही नियम आहे की, ज्यांच्या जन्मदाखला किंवा पासपोर्टवर लिंग या रकान्यात ‘स्त्री’ असे नमूद केलेले असेल, तेच तृतीयपंथी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. समाजतज्ज्ञ म्हणतात की, ”स्त्रीत्व हे शारीरिक लिंगावर अवलंबून नसते. स्त्री जन्मत:च स्त्रीवृत्तीची नसते. तिला समाज आणि संस्कृती ‘स्त्री’ म्हणून घडवतात.” ही संकल्पना जर आधुनिक विचारवंतांना जागतिक स्तरावर सर्वमान्य आहे, तर मग ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत केवळ कागदपत्रांवर ’स्त्री’ असा उल्लेख केल्यावरच सहभागी होता येईल, असे म्हणणे एकदा तपासायची गरज आहे. कारण, एकदा स्त्रीत्व हे शारीरिकलैंगिकतेपेक्षा ‘वृत्ती’ मानली, तर मग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केवळ कागदोपत्री ‘स्त्री’ असा उल्लेख असावा, असा निर्णय देणार्‍या लंडनच्या ‘मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन’चा स्त्रीबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट होत नाही. तृतीयपंथीयांना स्त्री म्हणून सहभागी व्हायचे आहे, तर त्यांना स्त्री आहोत, असा कागदोपत्री पुरावा सादर करावा लागणार आहे. यामुळे बराच गोंधळ निर्माण होणार आहे. त्याबाबत येणारा काळच भाष्य करेल. तसेच या नियमामुळे आपल्या देशातील तृतीयपंथीयांना ‘मिस वर्ल्ड पेजंट’मध्ये भाग घेता येईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण, आपल्या देशातल्या कायद्यानुसार तृतीयपंथी हे तिसरे लिंग मानल्याने तृतीयपंथीयांच्या जन्मदाखल्यावर आणि पासपोर्टवरही ‘स्त्री’ऐवजी ‘तृतीयपंथी’ हेच लिहिलेले असेल.

 
असो, मात्र ज्युलिया मोर्ले यांचा निर्णय अनुभवताना ज्यांना भेटून कित्येक रात्र झोप लागली नव्हती, ज्यांच्याबद्दल वाटले होते की, देवाने यांना क्षणाक्षणाला मरण्यासाठी जन्माला घातले आहे का? असे कित्येक तृतीयपंथी डोळ्यासमोरून आणि मनासमोरूनही तरळून गेले. जगात सर्वत्र तृतीयपंथीयांना तिरस्कृत आणि भीतीदायक गूढ असे काहीतरी आहे, या नजरेनेच बघितलेे जाते. आजही जगभराचा विचार केला तर एड्सने आजारग्रस्तांमध्ये तृतीयपंथीयांची संख्या जास्त आहे. आजही मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्यांमध्ये तृतीयपंथीयांची संख्या जास्त आहे. असणारच! पशुपेक्षाही भयाण जिणे असल्यावर मन आणि भावना असलेल्या या मानवयोनीत जन्म घेतलेल्यांना मानसिक आजार होणार नाहीत तर काय होणार? तृतीयपंथीयांच्या बाबतीत कुणीही यावे, लैंगिक शोषण करून जावे, असा अलिखित खेळ जगात सर्वत्र आहे. तृतीयपंथी साधारणतः एकत्र मिळून राहतात. तरीही त्यांच्यावर सातत्याने हल्ले होतात आणि अपहरण करून त्यांच्यावर क्रूर लैंगिक अत्याचार केले जातात आणि पुन्हा रस्त्यावर अक्षरशः फेकले जाते. हे अत्याचार करणारे विकृत नशेखोर असतात, पण काही वेळा केवळ गंमत म्हणूनही यांच्यावर अत्याचार केला जातो. इतका अन्याय सहन करूनही तृतीयपंथीयांना दाद मागता येत नाही. दाद मागितली तरी एक तर त्यांच्या लैंगिकतेचा अपमान करत तुम्हाला काय फरक पडतो? असे विचारत त्यांची कुचेष्टा केली जाते. जगभरात असेच अपमानजनक अनुभव तृतीयपंथीयांना येतच असतात. आदिकाळापासून आताही खर्‍या वंचित, शोषित आणि पीडित गटात जगणार्‍या या तृतीयपंथीयांनी समाजाचा प्रत्येक स्तरावरचा तिरस्कार सहन केला, तरीही ते समाजाचा भाग बनून राहिले. त्यांनी समाजद्रोह, देशद्रोह केला नाही. त्यांच्यातले माणूसपण मेले नाही. त्यांचे स्त्रीपणाचे अस्तित्व दाखविण्यासाठी चालणारा संघर्ष संपला नाही. त्यामुळे कितीही प्रश्न निर्माण झाले तरी ‘मिस वर्ल्ड’मध्ये तृतीयपंथी सहभागी होऊ शकतील, ही बाब नक्कीच जागतिक स्तरावर महत्त्वाची आहे
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121