.... तर नुकसान शिवसेनेचे - आशिष शेलार

    23-Jan-2018
Total Views | 14

 
खरतर आमची युतीचीच भूमिका होती. पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर २०१९ च्या लोकसभा, विधानसभांसाठी भाजप ही तयार आहे. महाराष्ट्रातील जनताही तयार आहे. नुकसान त्यांचेच होईल, असे विधान भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी केले आहे.
 
 
येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केली. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात आयोजित शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधींच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.
 
 
यावर मुख्यमंत्र्यांची दावोस येथून प्रतिक्रिया आली आहे. माध्यमांनी याविषयी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी "शिवसेना अनेकदा अनेक वक्तव्य करत असते मात्र यावर सध्या मी भाष्य न करता आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि पुढील निवडणूकीत देखील निवडून येण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे." अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121