जळगाव : जळगाव तलाठी योगेश पाटील यांना वाळू माफियांनी मारहाण केली असून संबंधित आरोपींना अजुनही अटक न झाल्याने आज तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पारोळा व पाचोरा येथील तहसिल कार्यालयात काम बंद आंदोलन केले.
पाचोरा व अमळनेर तालुक्यातील पिंगलवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यास दि. १७ रोजी गौण खनिज वाहतूकीस आळा घालण्यासाठी गेले असता तेथील शितल देशमुख, योगिराज चव्हाण, उमेश वाल्हे, श्रीकांत पाटील, शिरीष पाटील यांनी बेदम मारहाण केली, या गुन्हेगारांना त्वरीत अटक करावी या मागणीसाठी नाशिक विभागातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाचोरा येथील मंडळ अधिकारी व तलाठी संघटनेतर्फे अध्यक्ष जी यू गायकवाड, सचिव नकुल काळकर, मंडळ अधिकारी विनोद कुमावत, एस एल साळुंखे, एस टी महाले, पी पी राजपूत, तलाठी जी आर लांजेवार यांनी आंदोलनात सहभाग घेतला.