आजचा हा लघुपट तुमच्या आमच्या जीवनाच्या खूप जवळचा आहे. थोड्या फार फरकाने सगळ्याच घरांमध्ये आज ना उद्या लग्नाविषयी चर्चा होतेच. आज जरी प्रेम विवाहांचे प्रमाण वाढले असले, तरी देखील अजूनही काही घरांमध्ये 'अरेंज मॅरेज' ही होतात आणि त्या सगळ्यांसाठीच हा लघुपट नक्कीच बघण्यासारखा आहे.
आजच्या काळात काही आधी सारखे बघण्याचे कार्यक्रम होत नाही, ज्यामध्ये मुलगी लाजत बुझत चहा घेवून समोर येईल, मग तिला चालून दाखव बोलून दाखव गाऊन दाखव सारखे प्रश्न विचारण्यात येतील. एकट्यात बोलताना सुद्धा मुलगाच प्रश्न विचारणार आणि मुलीने केवळ लाजत लाजत हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं. आता जमाना बदलला आहे. आता मुलगा आणि मुलगी दोघेही समान पातळीवर येवून करिअर पासून पास्ट रिलेशनशप्स पर्यंत तर खाण्या पिण्याच्या आवडींपासून ते पालकांच्या सोबत रहायचं की वेगळं या पर्यंत सगळं काही बोलतात. हेच दाखवणारा हा लघुपट आहे.
बरेचदा आपण आपला जोडीदार शोधताना नेहमी त्याच्यात आणि आपल्यात काय 'कॉमन' (एकसारखं) आहे, हे बघण्याचा प्रयत्न करतो, मात्र अनेकदा दोन व्यक्तींमधील वेगळेपणच त्यांना एकत्र आणतं. ते म्हणतात ना 'ऑपोझिट अट्रॅक्ट' असच काहीसं. हेच सांगणारा हा लघुपट आहे, एक मुलगा आणि मुलगी लग्नासाठी एक मेकांना बघायला, बोलायला भेटतात. मात्र त्यांचं हे बोलणं, खूप परिपक्व आणि खूप प्रॅक्टिकल असतं. ते एकमेकांशी लग्न करतात? का नाही करत? ते बघण्यासाठी हा लघुपट नक्कीच बघा..
या लघुपटाला यूट्यूबवर ३ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. अरीझ गांधी, संस्कृती खेर आणि अवंतिका शेट्टी यांनी या लघुपटात मुख्यभूमिकेत काम केले आहे. नार्स क्रिचन्माचारी यांनी दिग्दर्शित केलेला हा लघुपट त्यांच्या नावाप्रमाणेच अगदी वेगळा आहे, त्यामुळे नक्की बघा.