रोहिंग्या मुस्लीम व भारतातील मुसलमान

    21-Sep-2017   
Total Views |

 
 
सध्या रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानमार, बांगलादेश व भारत यांच्यापुढे प्रश्न निर्माण करून ठेवला आहे. रोहिंग्या मुस्लीम म्यानमारमध्ये फुटीरतावादी व दहशतवादी कारवाया करत असल्याने म्यानमारला आपल्या देशात ते नको आहेत. म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या सू की यांनी याबाबत ठामभूमिका घेतलेली आहे. म्यानमारमध्ये त्यांनी लोकशाहीसाठी जो लढा दिला त्याबद्दल त्यांना शांततेचा नोबेल सन्मानही मिळाला आहे. जगभरातील ‘मानवतावादी’ म्हणविणार्‍या संघटना व प्रवक्त्यांनी आंग सान सू की यांनी रोहिंग्या मुसलमानांबाबत जी भूमिका घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांचा नोबेल सन्मान काढून घ्यावा, अशी मागणी सुरू केली आहे. पण त्या सन्मानाच्या प्रेमात त्या पडलेल्या नाहीत. आपली प्रतिमा जपण्यासाठी त्या आपल्या देशहिताचा बळी देण्यास तयार नाहीत. जगाच्या टीकेला आपण भीक घालत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. रोहिंग्या मुस्लीमबांगलावंशीय असल्याने त्यांना बांगलादेशने आसरा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. परंतु, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांना बांगलादेशात आश्रय देण्याची तयारी दाखविली असली तरी हा भार अधिक वाढू नये याची त्यांना काळजी आहे. आर्थिक ताण पडण्याबरोबरच त्यांचा उपयोग करून ‘इसिस’ दहशतवादाची केंद्रे निर्माण करील, याची त्यांना भीती वाटते. म्यानमारमधून समुद्रमार्गाने बाहेर पडणारे विस्थापित इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया आदी देशात आसरा शोधत आहेत. भारतातही सुमारे ४० हजार विस्थापितांनी आश्रय घेतला आहे. म्यानमारच्या राज्यकर्त्यांवर भारताने दडपण आणून रोहिंग्यांना त्याच देशात सुरक्षित जीवन जगू देण्यासारखे वातावरण निर्माण करण्यास भाग पाडावे, अशी मागणी केली जात आहे. त्याचबरोबर विस्थापित रोहिंग्यांना भारताने आश्रय द्यावा असेही वातावरण तयार केले जात आहे. या दोन्ही गोष्टींना भारताने नकार दिला आहे. म्यानमार रोहिंग्यांना आपल्या देशाचे नागरिक मानत नाही. रोहिंग्यांनीही तिथल्या संस्कृतीशी समरस होण्याचा प्रयत्न केला नाही. जगभरातील जिहादी दहशतवादी चळवळीचा प्रभाव त्यांच्यावरही पडला आहे. अशा परिस्थितीत भारत जिहादी दहशतवादाचे चटके सहन करीत असताना आपल्या अस्तनीत हा निखारा बांधून घ्यावा, असे तो म्यानमारला कसे सांगणार? ‘रोहिंग्या मुस्लीमहे आमच्या देशाचे नागरिकच नाहीत,’ अशी भूमिका म्यानमार सरकारने घेतली आहे.
 
भारताने बांगलादेशमधील हिंदू, चकमा बौद्ध यांबाबत जी भूमिका घेतली आहे, तशी रोहिंग्या मुस्लिमांबाबत न घेतल्यामुळे मानवतावादी प्रश्नाला भारताने धार्मिक स्वरूप दिल्याचा आरोप होत आहे. वास्तविक हा प्रश्नच निर्माण होण्यात धार्मिक श्रद्धेचा मोठा भाग असल्याने हा प्रश्न धार्मिकच आहे. फक्त तसा उच्चार न करणे ही सेक्युलर, पुरोगामी फॅशन आहे. इस्लामहा राष्ट्र किंवा धार्मिक सहअस्तित्वाची संकल्पना न मानता त्याच्यापेक्षा इस्लामी कौमच्या भावनेला अधिक महत्त्व देतो, पण ही संकल्पनाच भ्रामक आहे. जर इस्लामहा खरोखरच भ्रातृभाव निर्माण करणारा धर्म असता, तर आज विविध मुस्लीमदेशांत जो मुस्लीमच मुस्लिमांचा भीषण नरसंहार करीत आहेत, तसा तो झाला नसता. सीरिया, इराक, सौदी अरेबिया, इराण आदी मुस्लीमदेशांत जो भीषण संघर्ष सुरू आहे, त्यामुळे लक्षावधी लोक विस्थापित होऊन विविध युरोपियन देशात आसरा घेत आहेत. या विस्थापितांबरोबरच या देशात दहशतवादाचीही निर्यात होत आहे व त्यात युरोपीय देश होरपळून निघत आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर युद्धातील हिंसाचाराचे परिमार्जन करण्याकरिता विस्थापितांबाबत मानवतावादी भूमिका स्वीकारली. जर्मनीमध्ये ज्यू लोकांवर जे अत्याचार झाले, त्यामुळे जर्मनीमध्ये या प्रश्नावर अधिक हळवेपणा आहे, परंतु या देशांची मानवतावादी भूमिका म्हणजे आपल्याला आश्रय मिळण्याचे हक्काचे ठिकाण, अशी भूमिका निर्माण झाली आहे. जगातील प्रमुख प्रसारमाध्यमे त्याला हातभार लावीत आहेत. आधी अशा विस्थापितांचे स्वागत करणार्‍या जर्मनीच्या मर्केल याही आता सावध भूमिका घेऊ लागल्या आहेत. वास्तविक पाहता, अनेक इस्लामी देश हे तेलामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न झालेले देश आहेत, परंतु या धनाचा उपयोग जगभरातील मुस्लिमांचे जीवनमान सुधारण्यापेक्षा त्यांच्यात धार्मिक कट्टरतावाद निर्माण करण्यासाठी केला गेला. त्याचा परिणामअसा झाला आहे की, जगभरातील मुस्लीमसमाज जिथे अल्पसंख्य आहे, तिथे इतर समाजासोबत शांततेने जगू इच्छित नाही व जिथे तो बहुसंख्य आहे तिथेही शांततेने जगू शकत नाही. जिहादी दहशतवादाने मुस्लीममानसिकतेचा ताबा घेतलेला असून त्याला मुस्लीमसमाजातून अजूनही सक्षमआव्हान दिले गेलेले नाही. त्यामुळे मुस्लीमविस्थापितांचा प्रश्न कितीही हृदयात मानवतेचा कळवळा आणणारा वाटला व त्यातील बहुसंख्य लोकांचा ही परिस्थिती निर्माण करण्यात सहभाग नसला तरी ही परिस्थिती का निर्माण झाली, त्याचे उत्तर न काढता मानवतेच्या नावाखाली पलायनवादी उत्तरे काढली तर भविष्यात हा प्रश्न आणखी गंभीर होईल.
 
 ’’जगभरातील मुस्लिमांवरच विस्थापित होण्याची वेळ का येत आहे? असा प्रश्न जागतिक मुस्लीमसंघटनेच्या बैठकीत मी विचारला,’’ असे शेख हसीना यांनी सांगितले व ’’या प्रश्नावर विचार करण्याची वेळ आली आहे, असे काही सदस्यांनी सांगितले,’’ असेही त्या म्हणाल्या. आज जी इस्लामची शिकवण दिली जाते त्यातच इस्लामी विस्तारवादाची बीजे आहेत. पाकिस्तान, बांगलादेशसह जिथे जिथे मुस्लीमबहुसंख्य आहेत, तिथे अल्पसंख्याकांना विस्थापित व्हायला लागले. बांगलादेशमधून जे चकमा बौद्ध भारतात आले आहेत, त्यांना पुन्हा सुरक्षितपणे बांगलादेशात प्रस्थापित करण्याची जबाबदारी शेख हसीना घेणार असतील, तरच त्यांना रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारने परत घ्यावे, असे सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो. काश्मीरच्या खोर्‍यातून हिंदूंना बाहेर पडावे लागले तेव्हा तो मानवतावादी प्रश्न राहिला नाही. क्रियेला प्रतिक्रिया निर्माण होत असते. त्यामुळे जगभरातच मुस्लीमधर्म आणि समाज याविषयी संशयाचे वातावरण तयार होत आहे. दहशतवादाला धर्म नसतो, काही मुस्लीमगट दहशतवादी असले तरी इस्लामहा शांततेचा धर्म आहे, असा आजवर प्रचार केला गेला. पण त्या प्रचारातील फोलपणा आता जगाच्या लक्षात येत आहे. त्यामुळे ज्या प्रेरणेतून हा दहशतवाद जन्मत आहे, त्या मूळ कारणाला जोवर हात घातला जाणार नाही तोवर हा प्रश्न संपणार नाही. इस्लामच्या शिकवणुकीतील असहिष्णुतेचा भाग कालबाह्य झालेला आहे, हे स्पष्ट करून जिहाद, काफीर या संकल्पनावजा सामाजिक सहअस्तित्वाच्या संकल्पना जोवर रुजविल्या जात नाहीत, तोवर असे प्रश्न पुनःपुन्हा निर्माण होत राहाणार. ऑस्ट्रेलियाने आपल्या नागरिकत्वाचे नियमकडक करून जे ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संस्कृतीनुसार वागतील त्यांनाच नागरिकत्व देण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. आज ना उद्या हे सर्वच देशात घडणार आहे. प्रत्येक देशाला व समाजाला आत्मसुरक्षेचा मूलभूत अधिकार आहे. मानवतावादाच्या भाबड्या तत्त्वज्ञानाने आता फार काळ ’इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करता येणार नाही, हे म्यानमार व सू की यांनी सिद्ध केले आहे.
 
    रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावरून भारतातील मुसलमानांना चिथविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मुस्लिमांच्या वेगळ्या धार्मिक अस्मितेच्या मुद्द्यावरून भारताची फाळणी झाली. त्यामुळे मुस्लिमांचे कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. याच धार्मिक अस्मितेमुळे हिंदू व मुस्लीमसमाजात अविश्वासाचे वातावरण आहे. भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, या प्रचाराला बळी पडून हा अविश्वास अधिक वाढवायचा की रोहिंग्या मुस्लिमांपेक्षा आपण शेकडो वर्षे ज्यांच्यासोबत राहात आहोत त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व द्यायचे, याचा विचार त्यांनी करायचा आहे. रोहिंग्या मूळ बांगलादेशी, त्यांचे भांडण म्यानमारशी, त्यांना चिथविणार ‘इसिस’ आणि दंगली होणार भारतात. जर खरोखरच मुस्लीमबंधुभाव प्रभावी असेल तर सौदी अरेबिया, कतार, तुर्कस्तान, इराण, सीरिया, इसिस, इराक एकमेकांबरोबर कशासाठी भांडत आहेत? तोंडात इस्लामचे नाव ठेऊन प्रत्येक देश आपापल्या स्वार्थाकरिता भांडत आहेत. इथल्या मुस्लिमांचा स्वार्थ हिंदू समाजाशी सामंजस्याने वागणार आहे, असे जेव्हा इथल्या मुस्लीमसमाजाला वाटेल, तेव्हाच हिंदू-मुस्लीमसंबंधातील नव्या पर्वाला सुरुवात होईल. 
 
- दिलीप करंबेळकर

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय. 

अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121