स्मार्ट एन्ट्री

Total Views |

भारत ही स्मार्टफोन्सची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ. त्यात दर महिन्याला वेगवेगळ्या देशी-विदेशी कंपन्यांचे शेकडोंनी नवे फोन्स बाजारात दाखल होताच अनेक मोबाईलप्रेमींची पावले आपसूकच या नव्या स्मार्टफोन्सच्या नव्या तंत्रज्ञानाकडे वळतात. या महिन्यातही भारतीय बाजारपेठेत असेच काही नव्या आणि हटके फीचर्ससह स्मार्टफोन्स बाजारात एन्ट्री करणार आहेत. रक्षाबंधनही अनायसे सोमवारी आहे. तेव्हा बंधुंनो, आपल्या लाडक्या बहिणीसाठी स्मार्टफोन भेट द्यायचा किंवा ऑनलाईन बुक करायचा प्लॅन असेल,तर खालील स्मार्टफोन्सचा नक्की विचार करता येईल.

 

सॅमसंग गॅलेक्सी नोट-एफई

सॅमसंग या महिन्यात गॅलेक्सी नोट फॅन एडिशन (एफई) भारतात लॉन्च करण्याची शक्यता आहे.यामध्ये ’नोट-7’ सारखेच फिचर्स असणार आहेत. यामध्ये 5.7 इंचाचा 2-के अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच ’एक्सिनोस 8890’ प्रोसेसर देण्यात आला असून 4 जीबी रॅम आणि 64 जीबीची इंटर्नल मेमरी या मोबाईलमध्ये असणार आहे. पॉवर बॅकअपसाठी त्यामध्ये 3200 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच एफ-1.7 अ‍ॅपर्चरसोबतच 12 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. तसेच टाईप सी चार्जिंगबरोबर यात फिंगर प्रिंट स्कॅनरसारखे फिचर्सदेखील असणार आहेत. हा मोबाईल कोरल ब्लू, प्लॅटिनम गोल्ड, टिटॅनिअम सिल्व्हर, ऑक्सी ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल आणि भारतात त्याची अंदाजित किंमत 40 ते 42 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

 

सोनी एक्सपिरिया एल-1

हळूहळू स्मार्टफोन क्षेत्रात आपले अस्तित्व वाढवू पाहणार्‍या सोनी या कंपनीने या महिन्यात आपला’सोनी एक्सपिरिया एल-1’ स्मार्टफोन बाजारात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. हा फोन ’अ‍ॅन्ड्रॉईड-7’म्हणजेच अ‍ॅन्ड्रॉईड-नोगटवर काम करणार आहे. या मोबाईलमध्ये एमटी 6737 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल मेमरी असणार आहे, तसेच 256 जीबीपर्यंत मेमरी कार्डदेखील सपोर्ट करणार आहे. यात 2620 एमएएच क्षमतेच्या बॅटरीचा वापर करण्यात आला असून याचा रिअर कॅमेरा 13, तर फ्रन्ट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा असणार आहे. हा मोबाईल ब्लॅक, व्हाईट आणि पिंक वेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे. हा बजेट स्मार्टफोन असणार असून भारतात त्याची किंमत 10ते 11 हजारांदरम्यान असणार आहे.

 

मोटो झेड-2 फोर्स

भारतीय बाजारपेठेत आपली छाप सोडणारा मोटोरोला ऑगस्ट महिन्यात आपला ’मोटो झेड-2 फोर्स’मोबाईल लॉन्च करणार आहे. या मोबाईलमध्ये 5.5 इंचाचा 2 के पी-ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे.तसेच यामध्ये 835 स्नॅपड्रॅगन प्रोसेसरदेखील असणार आहे. तसेच 2730 एमएएच बॅटरीबरोबरच 12+12मेगापिक्सेलचा ड्युअल लेन्सचा रिअर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाईल 2 आणि 4 जीबीच्या दोन वेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये 64 जीबी आणि 128 जीबीची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. भारतात या मोबाईलची किंमत 47 हजार ते 48हजारांच्या दरम्यान असणार आहे. या मोबाईलमध्ये फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला असून तो वॉटरप्रूफदेखील असणार आहे. हा मोबाईल ब्लॅक, व्हाईट वेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

 

इन्फिनिक्स झिरो-4

हाँगकाँगची कंपनी इन्फिनिक्स ही आपल्या ’इन्फिनिक्स झिरो-4’ या मोबाईलद्वारे भारतीय बाजारपेठेत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. याच महिन्यात ही कंपनी आपला पहिला स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. हा फोन अ‍ॅन्ड्रॉईड-6 आणि अ‍ॅन्ड्रॉईड-7च्या कस्टमाईज ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. यामध्ये मीडियाटेक एमटी-6753 प्रोसेसर, 3 जीबी रॅम, 32 जीबी इंटर्नल मेमरी आणि 3200एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझरसह 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. भारतात याची किंमत25 ते 26 हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

 

नोकिया-6

या महिन्याच्या अखेरीस नोकिया-6 भारतात लॉन्च होणार आहे. यामध्ये 5.5 इंचाचा फुल एचडी स्क्रीन देण्यात आला असून तो अ‍ॅन्ड्रॉईड-7 नोगटवर काम करणार आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर, 3जीबी रॅम, 32 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि 3000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. एफ-2.0अ‍ॅपरेचरसोबत यात 16 मेगापिक्सेलचा रिअर आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.याबरोबरच त्यात फिंगर प्रिन्ट सेन्सर आणि स्टिरिओ स्पीकरदेखील देण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनवर प्री-रजिस्टर केल्यास ग्राहकांना हा फोन 15 हजारांमध्ये घेता येणार आहे, अन्यथा त्याची किंमत 20 हजारापर्यंत असणार आहे.

 

- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.