आता मीरा-भाईंदरही भाजपमय...

Total Views |

 


 

डरते वो है जो अपनी छवी के लिए मरते है,

मै तो हिंदुस्थान की छवी के लिए मरता हूँ |

 

अशाचप्रकारे देशात परिवर्तन आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विडा उचलला आणि पाहता पाहता देश भाजपमय होऊ लागला. गेली अनेक वर्षे कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने देशाची सूत्रे भाजपच्या हाती दिली आणि भाजपनेही ’सबका साथ सबका विकास’ म्हणत मोदींच्या विकासगाथेला दाद दिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अशा मोठ्या राज्यांच्या, तर अनेक महानगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्येही भाजपने सरशी घेतली. याचेच ताजे उदाहरण म्हणजे मीरा-भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक. एकूण ९४ जागा असलेल्या मीरा-भाईंदर पालिकेत बहुमतासाठी ‘४८’ हा मॅजिक फिगरचा आकडा. मात्र, तब्बल ६१ जागांवर मुसंडी मारत भाजपने शिवसेना, कॉंग्रेसचे पानिपत केले. भाजपचे ‘शत प्रतिशत’ धोरण, त्या दृष्टीने राबविण्यात आलेली आक्रमक रणनीती, भाजपशी सतत दोन हात करण्याच्या तयारीत असलेली शिवसेना आणि अमराठी उमेदवारांना उभे करण्याची कॉंग्रेसची खेळी या काही प्रमुख मुद्द्यांमुळे यावेळच्या निवडणुकीत एक वेगळीच रंगत निर्माण झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हटली तर एकेकाळी पालिकेवर वर्चस्व गाजविणार्‍या राष्ट्रवादीला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालिका क्षेत्रात प्रचारसभा झाली. ‘‘केवळ आता मॉनिटरसाठी जागा शिल्लक असून तिकडेही भाजपचा झेंडा फडकेल,’’ असा मिश्किल संवाद भविष्यात खरा ठरेल, अशीच काहीशी परिस्थिती.... वाघानेही डरकाळी फोडत ठाणे झाले, मुंबई झाले, आता मीरा-भाईंदर अशी गर्जना दिली. मात्र, वांद्राची डरकाळी काही मीरा-भाईंदरवासीयांना भुलवू शकली नाही. यापूर्वीही मीरा-भाईंदर पालिकेत भाजपचीच सत्ता होती आणि महापौरही भाजपचाच होता. गेल्या पाच वर्षांमध्ये पालिका क्षेत्रात झालेली विकास कामे, येत्या काळात होणारा मुबलक पाणीपुरवठा, भाजपने सादर केलेले संकल्पचित्र, आ. नरेंद्र मेहता यांचे नेतृत्व आणि मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार यावरून मतदार राजानेही भाजपच्याच पारदर्शक कारभाराला मतदान केले. पालिकेच्या मागील निवडणुकीत अवघ्या २९ जागा जिंकणार्‍या भाजपने या निवडणुकीत तब्बल दुपटीने जागा जिंकत शिवसेना व कॉंग्रेसला अक्षरश: धूळ चारली. येत्या काळातही पारदर्शी विकासाची हमी देणार्‍या भाजपचा विजय नाकारता येणार नाही.

 

 

विरोधकांचा सुपडा साफ

भाजप आणि शिवसेना यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईमुळे अटीतटीच्या झालेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शिवसेना, भाजप आणि काही अंशी कॉंग्रेसमुळे या निवडणुकीत अटीतटीचा सामना रंगेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा सपशेल फोल ठरली. मागील निवडणुकीत २९ जागा जिंकणार्‍या भाजपने विकासाच्या जोरावर तब्बल दुप्पट जागांवर विजय मिळवत कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या मनसुब्यांना लगाम कसला.

पालिकेत आपलीच सत्ता आणण्याचा निर्धार केलेल्या शिवसेनेला केवळ २२ जागांवर समाधान मानत विरोधातच बसावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे नेते गिलबर्ट मिंडोसा याच्या प्रवेशानेही शिवसेनेला फारसा फायदा झालेला दिसत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करून सेनेने १४ जागा जिंकल्या होत्या.त्या तुलनेने यावर्षी समाधानकारक जागा स्वबळावर जिंकल्या असल्या तरी सत्तासुखाचा मात्र अपेक्षाभंग झाला. भाजपच्या वादळासमोर शिवसेना, कॉंग्रेस अखेरच्या सत्रापर्यंत दुहेरी आकडा गाठू शकतील का?अशीही काहीशी परिस्थिती मतमोजणीच्या वेळी निर्माण झाली होती. मात्र, थोडे सावरत दोघांनीही दुहेरी आकडा गाठला आणि कॉंग्रेसला १० जागांपर्यंत मजल मारता आली. गेल्या निवडणुकीत २७ जागांवर विजय मिळवणार्‍या राष्ट्रवादीवर सर्व जागांवर उमेदवारही उभे न करता येण्याची नामुष्की ओढवली होती. बहुजन विकास आघाडीची यावेळी शिट्टीही वाजली नाही आणि मनसेच्या इंजिनाचं उरलं सुरलेलं एक चाकही निखळलं. गेल्या पालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३२ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी कॉंग्रेसने आणि राष्ट्रवादीने जागा मिळवून अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. पहिल्या अडीच वर्षात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, अपक्षांची सत्ता होती. मात्र, त्यानंतर शिवसेना आणि भाजपने बहुजन विकास आघाडी, अपक्षांची मोट बांधत सत्ता स्थापन केली. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोधात बसावे लागले. परंतु, यावेळी विरोधात काय, तर पालिकेच्या आसपासही न फिरकता येण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांंनी या ठिकाणी जाहीर सभा घेऊन केलेला प्रचार पाहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका दोन्ही पक्षांसाठी किती प्रतिष्ठेची होती, हे दिसून आले होते. अखेर या प्रतिष्ठेच्या लढाईत बाजी मारत भाजपने राज्यात आपणच एक नंबर असल्याचे दाखवून दिले.

 

- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा
पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121