शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : तलाक तलाक तलाक...

    22-Aug-2017   
Total Views | 3



आजचे शॉर्टअॅण्ड क्रिस्प नेहमीपेक्षा जरा वेगळे आहे. नेहमी या सदरात आपण एका लघुपटाविषयी चर्चा करतो, मात्र आज या सदरात तीन तलाक विषयी एका वेगळ्या पद्धतीतून भाष्य करणारा हा व्हिडियो आपण बघणार आहोत...

तीन तलाक विषयी आज अखेर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला. यामध्ये तीन तलाक ही प्रथा ६ महीन्यांपर्यंत स्थगित करावी, या ६ महीन्यात केंद्र सरकारने या विषयी कायदा करावा आणि अखेर कायदा झाल्यानंतर त्या कायद्यानुसार ही प्रथा बंद करण्यात येईल, असा निर्णय आज सुनावण्यात आला. याच तीन तलाकवर बंदी घालण्यात यावी म्हणून सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेली ही प्रस्तुती आहे. यामध्ये सूफी कथकच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना या प्रथेमुळे सहन कराव्या लागणाऱ्या यातनांविषयी भाष्य करण्यात आले आहे.

शरिया कायद्यानुसार मुस्लिम पुरुषांना त्यांच्या बायकोला केवळ तलाक तलाक तलाक हे तीन शब्द म्हणून, ईमेल द्वारे, किंवा आता तर व्हॉट्सअॅप मॅसेजच्या माध्यमातून देखील घटस्फोट देता येतो. मात्र यामुळे उध्वस्त होतं त्या महिलेचं आयुष्य, कारण हीच प्रथा पाळण्याचा अधिकार तिला नसतोच. एका क्षणात केवळ तीन शब्दांनी त्यांच्यातील नातं संपतं. "तुमसे जोडी खुशियाँ सारी तीन लफ्जों में सबकुछ हारी.." या शब्दांमुळे या प्रथेच्या यातनांचं मर्म लक्षात येतं. अत्यंत सुंदर प्रस्तुतीकणातून या कुप्रथेविषयी भाष्य करण्यात आले आहे.



अनेकदा या कुप्रथेमुळे महिला आत्महत्येसारखे भीषण पाऊल देखील उचलतात. या गाण्यातील "की कर लूँ मैं अब खुदखुशी कोई आरजू अब ना रही.. तुमने कहा.. मैंने सुना.. तलाक तलाक तलाक..." या शब्दांमुळे अंगावर काटा येतो. खरंच एका क्षणात असं कसं नातं संपू शकतं. हे अमानवीय आहे.. त्या महिलेचं काय? बरं.. तलाक झाला आणि त्यानंतर पुन्हा त्यांना एकत्र यावसं वाटलं तर? त्यासाठी असलेली पद्धत तर या तलाकच्या पद्धतीहून अधिक किळसवाणी आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेश मध्ये देखील ही प्रथा बंद करण्यात आली आहे, मात्र भारतात आज पर्यंत ही प्रथा सुरु होती. यामुळे अनेक महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. मनाला भिडणाऱ्या हाव भावांमधून हे मर्म या नृत्याच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

या गाण्याचे गीतकार आहेत, डॉ. दुष्यंत तर या गाण्याला संगतीबद्ध केले आहे, बिशाखा ज्योती यांनी, तसेच केका घोष आणि बिशाखा ज्योती यांनी गायलेल्या या गाण्यावर सूफी कथक बसवले आहे अनुपमा यांनी. तीन तलाकच्या यातनांना समजून घेण्यासाठी ही प्रस्तुती नक्की बघा..

- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121