गुगलची दुनिया

Total Views | 9

 

१९९८ साली गुगलची सुरुवात झाली. पाहता पाहता गुगल अगदी लोकप्रिय झाले. हाताळण्यासाठी अगदी सोपे असल्यामुळे गुगल अल्पावधीत नेटकर्‍यांच्या पसंतीसह उतरले. पण याच गुगलविषयी बर्‍याच अशी गोष्टी आहेत, ज्यांच्याशी आपण पूर्णपणे परिचित नाही. गुगलवर अशा काही ट्रिक्स आहेत, ज्या टाईप केल्यानंतर अनेकदा गुगल पाण्यात बुडताना तर कधी पूर्ण पान उलटसुलट झाल्याचे दिसेल. अशाच काही मजेशीर ट्रिक्सची टेक्निक आज जाणून घेऊया...



Google In 1980:


या ट्रिकचा वापर केल्यानंतर १९८० साली गुगल कशाप्रकारे काम करत होते आणि कसे दिसत होते, हे आपल्याला पाहता येईल. गुगलवर ‘Google In 1980' टाईप करून त्याखाली असलेल्या ‘I’m Feeling Lucky’ या ऑप्शनवर क्लिक करताच एक नवे पेज ओपन होईल आणि १९८० साली गुगल कशाप्रकारे काम करत होते आणि कसे दिसत होते, याचे दर्शन होईल.


Google Dinosaur Game :


अनेकदा इंटरनेट सुरू नसले तर आपल्याला संगणकासमोर बसून काय करायचे हा प्रश्‍न पडतो. अशावेळी इंटरनेटशिवाय ऑफलाईन गेमदेखील आपल्याला खेळता येऊ शकतात. मात्र, हे गेम तेव्हाच खेळता येतात जेव्हा इंटरनेट बंद असेल, म्हणजेच आपण ऑफलाईन असू. जेव्हा इंटरनेट बंद असेल अशावेळी आपल्याला गुगलवर ‘Unable to Connect to the internet’ हा मेसेज दिसेल. त्यावेळी आपल्याला हा डायनासॉरचा गेम खेळता येऊ शकतो.


Google Snake :


आज अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये ’स्नेक’ या गेमचा अनुभव घेतला असेल. गुगलच्या मदतीने या गेमचा पुन्हा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. गुगलवर अशाच एका ट्रिकचा वापर करून स्नेक हा गेम खेळता येऊ शकतो. त्यासाठी ब्राऊझरमध्ये गुगल ओपन करून त्यात ‘Google Snake’ हे टाईप करून ‘I’m Feeling Lucky’ यावर क्लिक केल्यानंतर ’स्नेक’ हा गेम खेळता येऊ शकतो.


Gravity Google :


गुगल ओपन करून त्यावर ‘Gravity Google’ टाईप करून ‘I’m Feeling Lucky’ वर क्लिक केल्यानंतर एक भन्नाट गोष्ट आपल्याला दिसेल. चक्क गुगलचे पेज उडताना किंवा तुटताना आपल्याला पाहता येईल. अशा या ट्रिकचा आपल्याला नक्कीच एकदा अनुभव घ्यायला हवा.


Flip a Coin :


आपण अनेकदा गेम खेळताना पहिल्यांदा कोणी खेळावा यासाठी टॉस करतो. अशीच एक ट्रिक आपल्याला गुगलवरही करता येऊ शकते. यासाठी आपल्याला कोणत्याही खर्‍या शिक्क्याची गरज भासणार नाही. केवळ गुगलवर जाऊन आपल्याला ‘Flip a Coin’ असे टाईप करावे लागणार आहे. त्यानंतर आधीच्याच सर्व ट्रिकप्रमाणे ‘I’m Feeling Lucky’ यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्याला हवे असेल ते हेड्स किंवा टेल्स सिलेक्ट करून टॉस करता येईल.


Do a Barrel Roll :


गुगलवर ‘Do a Barrel Roll’ टाईप करून ‘I’m Feeling Lucky’ वर क्लिक केल्यास गुगल पेजसोबत काय होईल, हे पाहणे मजेशीर असेल. यावेळी संपूर्ण पान उलट-सुलट होताना आपल्याला दिसेल.


Google Gravity Pacman:


या गुगल ट्रिकच्या मदतीने पूर्वी आपण कॉम्प्युटरमध्ये खेळत असलेल्या ‘pacman’ या गेमचा पुन्हा अनुभव घेता येणे शक्य होणार आहे. गुगलवर ‘Gravity Pacman’ हे टाईप करून ‘I’m Feeling Lucky’ यावर क्लिक करून हा गेम खेळता येऊ शकतो.

 

Google Sphere:


गुगलवर जाऊन ‘Google Sphere’ असे टाईप करून वरीलप्रमाणे ‘I’m Feeling Lucky’ वर क्लिक करून गुगल स्फिअरचा अनुभव घेता येणार आहे. यानंतर स्फेरिकल आकारात आपल्याला संपूर्ण पान दिसू लागेल.


Google Guitar :


गुगलवर सर्व ट्रिक्सप्रमाणेच या ट्रिकचाही अनुभव घेता येणार आहे. गुगलमध्ये ‘Google Guitar’ टाईप करून यावर क्लिक केल्यानंतर आपल्या पेजवर गिटार दिसेल. त्याचा वापर करून आपल्याला एक धून वाजवता येऊ शकते. तसेच ती रेकॉर्डही करता येऊ शकते.

 

- जयदीप दाभोळकर

 

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121