स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्याला मिळालेली स्वतंत्रता एकटे उपभोगणे? त्यात इतरांचा विचार नसणे? का एकटे इंडिपेंडेंट राहणे? नेमके काय? स्वातंत्र्यदिनानिमित्त आज शॉर्ट अॅण्ड क्रिस्प मध्ये एक खास लघुपट..
हा लघुपट खूप भावनिक आहे, आणि आजची परिस्थिती दर्शविणारा आहे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्याकडे असलेली एखादी वस्तु एखादी गोष्ट शेअर करणे आणि त्यामुळे इतरांना आनंदी करणे. हाच संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे. एक आजोबा, आपल्या नातीच्या बारस्याला टोरंटोला उपस्थित न राहू शकल्यामुळे स्काइपच्या माध्यमातून संपर्क साधू इच्छितात, मात्र ऐनवेळी त्यांचा लॅपटॉप खराब होतो. तो सुधारण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात, सर्व्हिस सेंटर ला फोन करतात, कंपनीचा टेक्नीशिअन देखील येतो.. मात्र लॅपटॉप काही ठीक होत नाही. मग ते काय करतात?... ते आपल्या नातीचे बारसे बघू शकतात? जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्कीच बघा..
हम चॅनल्सतर्फे प्रदर्शित या लघुपटात मानवी संबंधांचं खूप सुंदर चित्रण करण्यात आले आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे मृणाल भूखंडी यांनी. क्षणात डोळ्यात पाणी आणि क्षणात चेहऱ्यावर हसू आणणारा हा लघुपट एकदा तरी नक्कीच बघा...
- निहारिका पोळ