पंजाबी मध्ये मुलींना कौर असे म्हणतात, म्हणजेच उदाहरणार्थ अर्शप्रीत सिंह असेल तर तो मुलगा आणि अर्शप्रीत कौर असेल तर ती मुलगी. मात्र सध्या हे कौर ऐकले की डोळ्यासमोर दोन अगदी विपरीत चेहरे येतात, एक म्हणजे हरमनप्रीत कौर, भारतीय क्रिकेट संघाची धडाकेबाज खेडाळू आणि दूसरी म्हणजे गुरमेहेर कौर, देशात एका नव्या 'काँट्रोव्हर्सी' ला जन्म देणारी.. एक आजही आपल्या पाठीवर ८४ लिहिले असलेली जर्सी घालून ऑपरेशन ब्लूस्टारमध्ये शहीद झालेल्या आपल्या शिख बांधवांना श्रद्धांजली अर्पण करणारी, तर एक स्वत: लष्कर परिवारातील असून सुद्धा पाकिस्तानला चागंले म्हणणारी...
ये है दो कौर की कहानी...
कालचा इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेला महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अनेक कारणांनी महत्वाचा ठरला, यामध्ये भारताला हार जरी पत्करावी लागली तरी देखील यंदाच्या विश्वचषक स्पर्धेने आपल्याला एक गोष्ट मात्र नक्कीच स्पष्ट केली, की भारताकडे अतिशय सुंदर प्रतिभा असलेल्या महिला क्रिकेट खेळाडू आहेत, ज्या कुठलल्याही स्वरूपात पुरुष क्रिकेट खेळाडूंपेक्षा कमी नाहीत. मात्र या संपूर्ण संघात एक खेळाडू लक्षात राहते, ती म्हणजे फलंदाज हरमनप्रीत कौर.. आपल्या धडाकेबाज मात्र संयंमी खेळाने तिने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले.. उपांत्य फेरीत तिने ११७ चेंडूंमध्ये १७१ धावा करुन अक्षरश: विरोधी संघाला देखील आश्चर्यचकित केले. हरमनप्रीतच्या रुपाने देशाला एक उत्तम खेळाडू मिळाली आहे , जिने भारताचे नाव नेहमीच उंच केले आहे. आजही ही मुगली ८४ नंबरची जर्सी घालून आपला प्रत्येक विजय १९८४ मध्ये शिखांच्या दंगलीत शहीद झालेल्या शहीदांना अर्पण करते.
तर या उलट दूसरी कौर म्हणजेच गुरमेहेर कौर, जी एक विद्यार्थिनी आहे. दिल्लीच्या श्रीराम महिला कॉलेजमध्ये शिकत आहे. गेल्यावर्षी अचानक एका व्हिडियोमुळे तिला प्रसिद्धी मिळाली आणि सर्व तथाकथित बुद्धीवंतांनी तिला उचलून धरले. त्याचे कारण म्हणजे त्या व्हिडियोत तिने मूक विरोध प्रदर्शन केले होते, आणि लिहिले होते, "पाकिस्तानने माझ्या वडीलांना नाही मारले, मात्र युद्धाने मारले." या वादग्रस्त विधानामुळे ती खरे तर चर्चेत आली. पाकिस्तान हे आपले शत्रुराष्ट्र आहे, त्यांच्या सततच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनांमुळे देशातील अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. ती स्वत: लष्कर परिवारातील आहे, आपल्या वडीलांना गमविण्याचे दु:ख तिने स्वत: सोसले आहे, तरी देखील यासाठी तिने पाकिस्तानला दोषी न मानता, युद्धाला दोषी मानले. तिला अगली 'राजकीय विषय'च करुन टाकले. अनेक बुद्धीजीवी लोकांनी तिचा जयजयकार केला. वातावरण खूप तापले... मात्र देशाच्या गौरवासाठी हे योग्य होते??
एकीकडे हरमनप्रीत कौर आजही आपल्या मनावर १९८४ मध्ये शिखांच्या दंगलीत शहीद झालेल्या शिख बांधवांशी बांधिलकी जपते, तर दुसरीकडे गुरमेहेर कौर देशात एक नवीन वादंग उभे करते.. दोन्ही खरं तर "यूथ आयकॉन" झालेल्या. एक सकारात्मक पद्धतीने तर दुसरी नकारात्मक.. शेक्सपिअर म्हणून गेलाय "नावात काय ठेवलंय" पण एकाच नावाच्या जवळपास एकाच वयाच्या असलेल्या या दोघींमध्ये मोठा विरोधाभास आहे...
हरमनप्रीतचा जन्म पंजाबच्या मोगा या गावात एका साधारण परिवारात झाला. तिचे वडील देखील वॉलिबॉल आणि बास्केटबॉलल या खेळांमधले नावाजलेले खेळाडू. ऑपरेशन ब्लूस्टार मध्ये झालेल्या अत्याचाराविषयी तिच्या मनात नेहमीच खंत राहिली. ती आजही आपला प्रत्येक विजय, आपले प्रत्येक शतक त्या शहीदांना अर्पण करते. देशाप्रती बांधिलकी जपण्यासाठी कुठल्याही व्हिडियोची तिला गरज पडली नाही, का प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने काही केले नाही. केवळ आवडीमुळे क्रिकेटचा तिने स्वीकार केला आणि देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्येशाने आपल्या आदर्श 'विरेंद्र सहवाग' च्या मार्गावर पुढे जात तिने आज लांबचा पल्ला गाठला आहे. आज तिने देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.
गुरमेहेरचा जन्म जालंधर येथे एका सधन परिवारात झाला. तिचे शिक्षण सेंट जोसफ कॉन्व्हेंट शाळेत झाले. एका लष्कर परिवारात तिचा जन्म झाला. गुरमेहेरने देशात शांततेच्या नावानी वादाला जन्म दिला असला तरी तिने पुढे देशासाठी काहीच केल्याचे एेकीवात नाही. लष्कराच्या आणि वडीलांच्या नावाने तिने देशात कशी शांतता पसरवता येईल याविषयी मूक पण वेगळ्या पद्धतीने भाष्य केले, मात्र त्यामुळे देशात शांततेचे वातावरण कमी आणि शहीदांचा अपमान अधिकच झाला..
दोघी कौर.. दोघी देशातील वेगवेगळ्या विषयांशी जोडलेल्या, एकीने देशाचे नाव उंचावले, शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली, तर एकीच्या विवादास्पद वक्तव्याने शहीदांचा अपमान केला..
किती हा विरोधाभास नाही.....
- निहारिका पोळ