हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया...

Total Views | 6
 

 
 
अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या पंजाबमधील तरुणांच्या जीवनावर आधारित ’उडता पंजाब’ हा चित्रपट हल्लीच प्रदर्शित झाला होता. चित्रपटात ड्रग्जमध्ये आकंठ बुडालेल्या पंजाबची सत्य आणि करुण कहाणी समोर आली. मात्र, आज त्याच पंजाबची बरोबरी आपला महाराष्ट्र करतोय की काय? अशी विदारक परिस्थिती समोर आलीय. महाराष्ट्रातील अंमली पदार्थांमुळे आपली जीवनयात्रा संपवणार्‍या तरुणांच्या आकडेवारीवर नजर टाकली की हे नशेची झिंग किती खोलवर रुजलीय, याची कल्पना येते.
 
अमली पदार्थांच्या व्यसनामुळे एकट्या महाराष्ट्रात तीन वर्षांत तब्बल ६ हजार ३७० तरुणांनी आपल्याच हाताने आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे पंजाबनंतर आपला महाराष्ट्र या नशेखोरीच्या गर्तेत पुरता अडकला आहे. आज अमली पदार्थांचे सेवन करू नये, अशा अनेक जाहिराती प्रदर्शित होत असतात. मात्र या जाहिराती कराव्याच लागणं यापेक्षा मोठं दुर्देव ते कोणतं? आज अफू, चरस, गांजा अशा अमली पदार्थांची महाविद्यालयीन तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या पदार्थांवर आज बंदी असली तरी अनेकांनी अवैध मार्गांनी यावर तोडगा काढला आहे. आज चक्क अशा पदार्थांची ऑनलाईन विक्रीही सुरू झाली आहे. त्यामुळे हे अमली पदार्थ तरुणांच्या हाती सहज लागणे शक्य झाले आहे.
 
केवळ २०१३ साली अमली पदार्थांच्या व्यसनामुळे ३ हजार ५०० जणांनी आपला अंत करून घेतल्याचे ‘नॅशनल क्राईमरेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालातून समोर आले आहे, तर २०१४ मध्ये हीच संख्या तब्बल पाच हजारांवर जाऊन पोहोचली. गेल्या वर्षी अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येत तब्बल ७०० जणांची भर पडली. केवळ महाराष्ट्राची आकडेवारी लक्षात घेतली, तर २०१३ साली १,६८९ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, तर २०१४ आणि २०१५ साली अनुक्रमे १,७९४ व १,३८२ जणांनी आपल्या जीवनाचा अंत करून घेतला. अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या केलेल्यांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू आहे. आज व्यसनांच्या आहारी जाणार्‍या तरुणांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यासाठी प्रामुख्याने ड्रग्स माफियांना आळा घालणे आवश्यक आहे. नाहीतर उद्या देशाचे भवितव्य ’हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया ...’ असेच होईल.
 
0000000000000000000000000
 
 
चीनचा पोटशूळ
     
एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बैठकीसाठी धडपडत असताना, दुसरीकडे मात्र खुद्द ट्रम्प यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटीचे खास आमंत्रण पाठवले. मोदी-ट्रम्प यांची पहिली भेट यशस्वी ठरली आणि यामुळे पाकिस्तानचा जळफळाट होणे म्हणा स्वभाविक. सौदी अरबमध्येही मुस्लीम राष्ट्रांच्या परिषदेत शरीफ यांना एका कोपर्‍यात ‘शरीफ’ असल्यासारखेच गप्प बसावे लागले. त्यांना आपले भाषण सादर करण्याची साधी मुभाही देण्यात आली नव्हती. एखाद्या पंतप्रधानाचे असे होणारे हाल हे कीव आणण्यासारखे होते. मात्र, यातच भारत आणि अमेरिकेदरम्यान आखली जाणारी धोरणे आणि वाढते द्विपक्षीय संबंध याचा पाकिस्तानचा तथाकथित मित्रदेश असलेल्या चीनला पोटशूळ उठला नाही, तरच नवल! मोदी-ट्रम्प भेटीनंतर अमेरिका आणि भारतामध्ये कोणती धोरणे ठरतात यावर पाकिस्तान आणि चीनची डोकेदुखी किती वाढेल हे ठरणार आहे. भारताची इराण आणि अफगाणिस्तानबरोबर वाढणारी मैत्री हीदेखील चीनच्या नजरेत खुपतेय. मधल्या काळात अफगाण-भारत मुक्त हवाई महामार्ग विकसित करण्यात आला. त्यामुळे भारत, अफगाणिस्तानला पाकिस्तानवर विसंबून राहावे लागणार नाही, तर दुसरीकडे ग्वादार बंदराला पश्चिमचीनशी जोडणार्‍या प्रकल्पावरही धोक्याचे सावट आहे. हा मार्ग पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानसारख्या प्रांतांमधून जात असल्याने तेथे कामगार आणि अधिकार्‍यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. पुढे याचा परिणामचीनच्याच गुंतवणुकीवर होणार असल्याने चीनची डोकेदुखी वाढली आहे. ग्वादार बंदराच्या विकासात संपूर्णत: चीनचीच गुंतवणूक आहे. त्यामुळे भविष्यात भारत अमेरिकेच्या वाढत्या मैत्रीमुळे पाकिस्तानची कोंडी झाली, तर चीनच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रात भारताने अमेरिकेशी हातमिळवणी केली, तर चीनची तिकडेही कोंडी होणार हे निश्चित. सर्वच ठिकाणी आज चीनने आपला होणारा जळफळाट व्यक्त केला आहे. मग तो भारताच्या एनएसजी सदस्यत्वासाठी असो, अजहर मसुदचा मुद्दा असो किंवा परवा सिक्कीममध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न असो. अमेरिकेतील शिखर बैठकीत आपल्या विरोधात कोणता डाव खेळला जाऊन आपली कोंडी होऊ नये यासाठी चीनची केविलवाणी धडपड सुरू आहे. सध्याची गुंतवणूक ही चीनची सर्वात मोठी गुंतवणूक असल्याने ’चीनचा पोटशूळ’ हा या निमित्ताने बाहेर आला आहे.
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा
रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121