शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : "लगोरी"

    27-Jun-2017   
Total Views | 9



लगोरी म्हटलं की, आठवतं ते बालपण. ती सोसायटी मधली किंवा वाड्यामधली मोठ्ठी गँग, त्यांच्या सोबत उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत तासंतास लगोरी खेळणं, ते धावणं, ती लगबग, तो सा... ट्टकन लागलेला मार.. त्याची मज्जाच काही औरच. पण ही लगोरी ती नाही. ही लगोरी आहे, एका अशा मुलाच्या संघर्षाची कहाणी ज्याचं लहानपणापासून केवळ हसंच झालं आहे. आज बघूयात ही आगळी वेगळी लगोरी..

एक मुलगा. चष्मा घातलेला, स्थूल प्रकृतीचा, बुझरा. आकर्षक असं काहीच नाही त्याच्यात. बाहेरून मुंबईत आलेला. कॉलनीतील मित्रांसोबत लगोरी खेळतोय, मात्र त्याला काहीच जमत नाहीये, लगोरी फोडता ही येत नाहीये, धावताही येत नाहीये आणि काहीच नाही. कमजोर व्यक्तिमत्वाचा असल्याने सगळे त्याची टर उडवतात. त्याला हसतात, आणि इथूनच सुरुवात होते त्याच्या आयुष्याच्या रॅगिंगची. आणि अचानक पुढचा सीन येतो, ज्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये मरणासन्न अवस्थेत पडलेला एक मुलगा, लोकल मधून खाली पडला असं कोणातरी सांगतं. डॉक्टर्स त्याला वाचविण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत.. मात्र तो वाचेल? त्या लगोरी खेळणाऱ्या मुलाचा, आणि या ऑपरेशन थिएटरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाचा काही संबंध आहे का? असेल तर काय? आणि हे रॅगिंग कुठून आलं.. या सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की बघा "लगोरी" हा लघुपट..
 

 
सिक्स सिग्मा फिल्मच्या या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे प्रथमेश मदन पाटील याने.. आयुष्यात आपलं कितीही हसं झालं, कुणी कितीही चिडवायचा प्रयत्न केला, अगदी देवाने ही आणि आयुष्यानेही तरीही जिंकण्याचा एक चान्स आपल्याकडे नेहमी असतो हा मोलाचा संदेश या लघुपटात देण्यात आला आहे. वरची कथा थोडी अर्धवट वाटली असणार, अनेक प्रश्न देखील पडले असणार. त्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी नक्की बघा "लगोरी."..
 
- निहारिका पोळ 

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत

मंदिर-चर्चपासून थेट गावांपर्यंत 'कलम ४०' चा गैरवापर; वक्फ बोर्डाचे धक्कादायक वास्तव उघडकीस!

लोकसभेत १२ तासांबून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक पास झाले. दरम्यान विधेयकाच्या बाजूने एकूण २८८ मते पडली, तर विरोधात २३२ मते पडली आहेत. वास्तविक हे विधेयक वक्फ मालमत्तेच्या पारदर्शकतेबाबत आहे, मात्र विरोधक याला धार्मिक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर वक्फ विधेयकात सुधारणा करणे आवश्यक होते. कारण त्यातील 'कलम ४०' त्याला कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्याची सूट देत होते. अशातून वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीच नाही तर मंदिरे आणि चर्चवरही आपला दावा मांडला होता. Waqf Board misuse of ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121