या प्लास्टिकचे काय करायचे?

    04-May-2017   
Total Views | 12

 

जुनी गोष्ट आहे. रस्त्यात एक मोठा बोर्ड लावला होता -

जे तयार करता येत नाही, ते नष्ट करू नका

जे नष्ट करता येत नाही, ते तयार करू नका!

बेस्ट मंत्र आहे!

जे चिरून, वाळवून, जाळून, पुरून, बुडवून कश्शा कश्शाने म्हणून नष्ट करता येत नाही, त्या प्लास्टिकचे काय करायचे? अतृप्त भूत, प्रेत, समंधा सारखे, मृत्यूचे सुद्धा भय नसलेल्या, इतस्त भटकणाऱ्या प्लास्टिकचे काय करायचे? निष्पाप मूक प्राण्यांना पछाडणाऱ्या, या प्लास्टिकचे काय करायचे? 

प्लास्टिकने आपले जीवन इतके व्यापले आहे, की दिवसाची सुरवात तोंडात प्लास्टिकचा ब्रश घालून होते. केस विंचरायला प्लास्टिकचा कांगावा नाहीतर प्लास्टिकचा ब्रश. अंघोळीला प्लास्टिकची बादली, प्लास्टिकचा तांब्या. बाहेर काहीही प्यायचे म्हणले तर - प्लास्टिकचा पेला, प्लास्टिकची straw नाहीतर किमान एक प्लास्टिकची बाटली तरी लागतेच. जेवण प्लास्टिकच्या डब्यात, प्लास्टिकच्या चमच्याने, नाहीतर मेलामायीनच्या प्लेटमध्ये. अंगावर पोलीस्टर, नायलॉन, रेयोन सारखे सिंथेटिक कपडे. खेळायला प्लास्टिकची बाहुली आणि प्लास्टिकची कार. आणि खरेदीला तर लागते प्लास्टिक फार! जरीची साडी असो, ऑडीची गाडी असो नाही तर कोथिंबीरिची काडी असो! सगळं प्लास्टिकच्या वेष्टनात गुंडाळून येते.

या प्लास्टिकचे काय करायचे?

शिळे अन्न प्लास्टिकमध्ये घालून टाकले. त्या कचऱ्याचे अक्षरशः डोंगर झाले आहेत. हा प्रातिनिधिक फोटो आहे चेन्नईच्या कचऱ्याचे. केवळ शिळे अन्न असते तरी ठीक आहे, नसून कुजून जाईल. पण इथे ते अन्न प्लास्टिकमध्ये बांधले आहे. आणि या कचऱ्यावर  चरत आहेत – गायी आणि हत्ती. भारतात गायी आणि हत्तींवर अशी वेळ यावी हा आपल्या निसर्ग पूजेचा दारुण पराभव आहे.


प्लास्टिकच्या पिशवी सकट, शिळे अन्न खाऊन गायी-वासरे मरत आहेत. फोटोत आहे एक प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन मेलेले वासरू. याहून करूण दृष्य काय असू शकते?

आम्ही लहान सहान प्लास्टिकच्या वस्तू फेकून दिल्या. कित्येक पक्षी बारक्या वस्तू अन्न समजून खातात. एका मृत आल्बेट्रोस पक्ष्याचा फोटो. अजून एका मुक्या प्राण्याचा अंत.   

फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या वस्तू, नदी नाल्यातून वाट काढत काढत समुद्रात पोचतात. प्लास्टिक खाऊन लहान मोठे मासे मरतात. मेलेला प्राणी समुद्राच्या तळाशी जाऊन पडतो, सडतो, नष्ट होतो. मग त्या प्राण्याच्या पोटातले प्लास्टिक मुक्त होते आणि पुन्हा ते भुतासारखे पाण्यात तरंगू लागते. आणखी कोणी प्राणी तेच  प्लास्टिक खाऊन त्या ‘सिरीयल किल्लर’ ला बळी पडतात. फोटो मध्ये प्लास्टिक खाऊन मेलेले व्हेल मासे आहेत.

समुद्रातील निष्पाप जीव प्लास्टिकने हैराण झाले आहेत. प्लास्टिकच्या वस्तुत लहानपणी अडकल्याने त्यांची  वाढ सुद्धा नॉर्मल झाली नाही, अशा काही कासवांचा फोटो.

‘पाप’, ‘पाप’ म्हणतात ते याहून काही वेगळे असू शकते का? ‘मी कधीच कुणाचे काही वाईट केले नाही’ असे आपण छातीठोकपणे म्हणू  शकतो का?

ही चित्रे नवीन नाहीत. मागे हे पाहून आम्ही, ‘अरेरे! वाईट झाले!’ असे म्हणून आमच्या कामाला लागलो. जमिनीवर प्लास्टिकच्या कचऱ्याचे डोंगर साचत राहिले आणि समुद्रात प्लास्टिक पडत राहिले. रोज कपडे धुतांना, सिन्थेटिक कपड्यातून निघालेली म्याक्रो तुसे पाण्यातून समुद्रात गेली. समुद्रातील प्लास्टिकचे तुकडे तुकडे होऊन त्याचेही मायक्रो तुकडे झाले.

आता हा खेळ उलटला आहे. त्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे भूत आपल्याच मानगुटीवर बसणार आहे.

समुद्रातील मासे, प्रॉन्स आदि Seafood मध्ये मायक्रो प्लास्टिक आहे.

समुद्रातील मिठात सुद्धा मायक्रो प्लास्टिक आहे.

माणसाच्या ताटात प्लास्टिक आले आहे.

 

या प्लास्टिकचे काय करायचे?

वैयक्तिक पातळीवर, प्लास्टिकचे तुम्ही काय करता किंवा काय करता येईल हे आम्हाला कळवा. आमच्या पर्यंत पोहोचलेले उत्तम उपाय, जागतिक पर्यावरण दिना निमित, ५ जूनच्या आठवड्यात ‘नाद बागेश्री’ या सदरात प्रसिद्ध केले जातील.

उपाय या email address वर पाठवावेत – mumbaitarunbharat@gmail.com 

Subject मध्ये – ‘या प्लास्टिकचे काय करायचे?’ असे लिहून आपला लेख/ प्रतिक्रिया पाठवावी. 

शेवटची तारीख – २५ मे २०१७

आपले नाव, गाव व फोन नंबर लिहावयास विसरू नये.

 - दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

Waqf Amendment Bill २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही ..

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121