नक्षत्रा अगं तुझा डीपी का दिसत नाहीये? श्रद्धाने घाई गडबडीत तिच्या लाँग टाईम बेस्टी नक्षत्राला फोन केला. नक्षत्रा अपेक्षाच्या अगदी उलट एकदम कूल होती. "हो अगं. मी व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल केलंय." नक्षत्राने शांतपणे सांगितलं. श्रद्धाला धक्काच बसला. जी मुलगी व्हॉट्सअॅप शिवाय राहू नव्हती शकत, जिला एक दिवस डीपी बदलला नाही तर चैन नव्हतं पडत, जी ग्रुप वर टाईमपास केल्याशिवाय झोपायची नाही ती आता व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल काय करते अरे...
"नक्ष.. तुझं आणि साकेतचं भांडण झालंय का ? तो तुला काही बोलला ? म्हणून तू हे करतेयस ?" श्रद्धाने न राहवून विचारलं. "अगं मॅड आहेस का तू. We are completely fine, cool. even we have discussed about it." नक्षत्रा अजूनही कूल होती. आणि म्हणूनच श्रद्धाचं टेम्पर वाढत चाललं होतं. "नक्षत्रा आता सांगणार आहेस का ? Why you are doing this ?" श्रद्धा खूप चिडली आता.
"अगं ए.. चिडते काय. सी... मला ना वैताग आलाय आता. रात्री शांत झोप पण होत नाही. you remember 3 years back when we had simple that keypad वाला फोन.. सुख होतं. साकेत ऑनलाइन असेल तर मला टेन्शन, नसेल तर मला टेन्शन, रिप्लाय आला नाही तर त्रास, आला आणि बोलणं झालं नाही तर त्रास. ग्रुपवर दर दिवसाआड काही तरी होणार, कुणी तरी ग्रुप सोडणार. श्याह... नको झालंय ते आता. रात्र रात्र चॅट करायची सवय झालीये. you know I feel so drowsy at times.. आणि तसं पण इन्स्टा आणि एफबी वर असणारे मी. लगेच नाही सन्यास घेत." असं बोलून नक्षत्रा जोर जोरात हसायला लागली.
"श्रद्धाला काही केल्या कळेना हिला झालंय काय?.. का गं काकू खूप रागवल्या का तुला? Are you sure.. you are doing it willingly? तिने कन्फ्यूज होवून विचारलं. "श्रद्धा गप अगं. मला कंटाळा आलाय आता सतत चिकटून एकमेकांच्या लाईफ मध्ये अननेसेसरी ढवळाढवळ करणं. I need peace.. चल आता भेटूच संध्याकाळी मलाही डान्सक्लासची गडबड आहे. Chill I am fine.. " असं म्हणत नक्षत्राने फोन ठेवला.
श्रद्धाला झेपलं जरी नव्हतंतरी पटलं मात्र होतं. काही दिवस आपणही जरा व्हॉट्सअॅपच्या जगातून बाहेर यायला हरकत नाही. असा विचार करत श्रद्धाने लगेच हातातल्या फोनमधून व्हॉट्सअॅपला टाटा बायबाय करण्यास सुरुवात केली...
आता आपणही काही दिवस व्हॉट्सअॅपला टाटा बाय बाय करुन बघूयात..
- निहारिका पोळ