असं म्हणतात प्रेम हे अत्यंत अनपेक्षित वेळेला सगळ्यात अनपेक्षित व्यक्ति बरोबर होतं. आणि प्रेम हे कधीच बाहेरील सौंदर्य बघत नाही ते मनाचे सौंदर्य बघतं. तसंच काहीसं घडलं ललिता सोबत. ललिता बेनबंसी एक साधारण मुलगी मात्र तिच्या माथेफिरु भावाने तिच्यावर अॅसिड हल्ला केला आणि तिच्या आयुष्यातील काळरात्र सुरु झाली. आपलं आयुष्य आता कधी बदलेल, आपण आता कधीतरी प्रेमात पडू शकू, सामान्य आयुष्य जगू शकू असे तिला वाटलेच नव्हते. मात्र एके दिवशी आलेल्या 'त्या' राँग नंबरने तिचे आयुष्य बदलले, आणि आज ललिताचे लग्न सुखात पार पडले.
परीकथेसारखी गोष्ट वाटते ना? मात्र आपल्या आयुष्यात 'त्या' घटनेनंतर कधीतरी परीकथेसारखं काहीतरी घडेल याची ललिताला अपेक्षाच नव्हती. २०१२ मध्ये तिच्याच एका नात्यातील भावाने घरातील क्षुल्लक वादावरुन तिच्यावर अॅसिड हल्ला केला. एकूण १७ शस्त्रक्रियांनंतर ललिताच्या सगळ्या आशा आकांक्षा संपल्या होत्या. मात्र अचानक एकेदिवशी तिला एक राँग नंबर वरुन फोन आला. तो फोन होता राहुल कुमार या तरुणाचा. चुकुन लागलेल्या फोनवर बोलणं सुरु झालं आणि ललिताचं आयुष्य बदललं.
'मला सुरुवातीपासूनच वेगळं काहीतरी करायचं होतं. आणि मला विश्वास होता की मी नक्कीच काही तरी चांगलं करु शकेन, मला ललिताच्या बाह्य रुपापेक्षा तिचं मन खूप आवडलं. माझ्या आईनेही माझी खूप साथ दिली. आज मी आनंदी आहे." अशा भाना राहुल याने व्यक्त केल्या आहेत.
"मला कधीच वाटले नव्हते की मी लग्न करु शकेन, राहुलला सगळं सत्य माहीत असून सुद्धा तो माझ्याशी लग्न करायला तयार झाला, हे माझं भाग्यंच आहे." अशा भावना ललिताने व्यक्त केल्या.
अभिनेता विवेक ओबेरॉय या लग्नात सहभागी झाला. त्याने ट्विटर वरुन आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, "ललिता एक खरी हीरो आहे, तिने हजारो अॅसिड हल्ल्यातील पीडित मुलींना महिलांना ही प्रेरणा दिली आहे की हा पूर्ण विराम नाही, आयुष्य याच्याही पुढे आहे." विवेकने या नवविवाहित जोडप्याला लग्नाची भेट म्हणून 'घर' दिलं आहे.
Lalita is a true hero cz she proves 2 1000s of acid attck survivors nationwide tht this isnt a full stp,jst a comma,lyf hs mny possibilities pic.twitter.com/tNvooXfIE1
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 23, 2017
Lalita is a true hero cz she proves 2 1000s of acid attck survivors nationwide tht this isnt a full stp,jst a comma,lyf hs mny possibilities pic.twitter.com/tNvooXfIE1
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 23, 2017