मने बॅग आवरलीस ना? चल पटापटा सगळं ठेवून घे. उद्या पहाटे निघायचंय आपल्याला. आईने घाईघाईतच अनयाला हलवलं. अनया व्हॉट्सअॅपमध्ये इतकी गुंग होती. की तिला काही ऐकायलाच आलं नाही. ती तशीच तिथेच बसून राहीली. 'अगं अनया.. उठतेस का आता. तुझी १०वी संपली म्हणून जातोय ना आपण.." आई चिडून बोलली. 'मम्मा.. please can't we go somewhere else' अनया कंटाळून बोलली. "अगं मी आत्ताच नेट वर चेक केलं. तिथे रेंज पण नाहीये. आपल्या हॉटेलमध्ये वायफायपण नाहीये.. का आपण अशा भलत्या ठिकाणी जातोय." इति इरिटेट झालेली अनन्या.
अगं आपण आसामला जातोय. ते पण तिथल्या गावात. तुझी मावशी आणि काका रहायचे ना.. तिथेच. तिथे आपण Actual चहाची शेती करणाऱ्या लोकांसोबत राहणार आहोत. आणि आपलं हॉटेल नाही रेस्ट हाऊस आहे. तिथे कुठून येणार वायफाय. you trust me nanu... it will be great experience for you beta... आईने तिच्याच भाषेत तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
बट मम्मा.. मला फोटो काढून लगेच फेसबुक आणि इन्स्टावर टाकायचे असतील तर कुठून टाकणारे मी. No contact with anybody.. whats this ma.. अनयाने आपली बाजू ठेवायचा प्रयत्न केला. त्यावर लगेच आई बोलली, "अगं मी, बाबा आणि दादा सोबतच असणार आहोत ना तुझ्या . अजून कोणाच्या कॉन्टेक्ट मध्ये रहायचंय तुला? अनया आता ऊठ आणि कामाला लाग. कधी पासून तुझी एकच कटकट सुरुए. एकतर बाबा इतका पैसा खर्च करुन नेतायेत ते गेलं एकीकडे.. तुला आपलं व्हॉट्सअॅप चालणार नाही याचीच काळजी. ऊठ लगेच.
पुढच्या दिवशी सगळे उत्साहित होते. अनया मात्र तशीच बोअर आणि वैतागलेली होती. दादाने म्हटलं, " अनया तिथे जावून मस्त फोटो काढू.. टेन्शन का घेतेस.. you should enjoy this trip.." तिने नुसतं.. हम्म्म असं उत्तर दिलं आणि हिरमुसलेल्या चेहऱ्याने व्हॉट्सअॅपवर ग्रुप्समध्ये see you after 10 days चा मॅसेच पोस्ट करण्यात ती व्यस्त झाली.
लांबचा प्रवास संपायला आला होता. जसे जसे ते त्यांच्या रेस्ट हाऊसकडे जात होते अनया रेंज शोधण्यासाठी कुठे मोबाईल वर ने कुठे कोपऱ्यात ने असं करत होती. तिला काही केल्या रेंज मिळेना. रेस्ट हाऊसला जावून, थोडा आराम करुन, आवरुन आई बाबा दादा आणि अनया बाहेर पडले. आणि आजू बाजूचे दृष्य पाहून अनयाला आपसूकच मोबाईलचा विसर पडला.
आई ते बघ कित्ती सुंदर आहे ना तो व्यू.. अनया खूश झाली.. ते थंड वेदर, गारवा, आणि सुंदर चहाचे मळे.. दादा आणि अनयाने वेगवेळ्या पोझेज मध्ये फोटो काय काढले. एक मेकांना चिडवले काय.. रात्री चौघांनी मिळून पत्ते काय खेळले... फुल्ल टू धम्माल केली. त्या १० ही दिवसात अनयाला एकदाही आपण "नॉन कनेक्टेड" आहोत असं वाटलं नाही. कारण निसर्गासोबत, तिच्या परिवारासोबत तिचं हरवलेलं कनेक्शन इतकं घट्ट जुळलं होतं की तो निसर्ग बघण्याच्या नादात, दादाला त्रास देण्याच्या नादात ती कधी कधी फोटो काढायला ही विसरुन जायची.
ट्रिपहून परत आल्यावर अनयाच्या अनेक मैत्रीणींनी विचारलं व्हॉट्सअॅप शिवाय बोअर नाही झालं का?, मग फोटोज इतक्या उशीरा का टाकले? तेव्हाच का नाही टाकले वगैरे. पण तिच्याकडे ट्रिपच्या अनुभवांची इतकी छान शिदोरी होती, की या सगळ्यांबद्दल विचार करायला सु्द्धा तिला सुचले नाही. इतर सगळ्यांकडेच २४ तास व्हॉट्सअॅप होते, पण तिच्याकडे असलेला अनुभव फक्त तिचा होता... आणि हेच सगळ्यात जास्त सॅटिस्फायिंग होतं....
- निहारिका पोळ